Home /News /lifestyle /

राशीभविष्य : तुळ आणि मकर राशीच्या लोकांनी दीर्घकालीन गुंतवणूक करणं टाळा

राशीभविष्य : तुळ आणि मकर राशीच्या लोकांनी दीर्घकालीन गुंतवणूक करणं टाळा

कोणाला मिळणार शुभ वार्ता कोणाचे स्टार्स चमकणार? जाणून घ्या आजच राशीभविष्य.

    मुंबई, 03 मार्च : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणामही आपल्यावर होत असतो. त्यामुळे आजचा आपला दिवस कसा असेल? हे जाणून घ्या 03 मार्चचं राशीभविष्य. मेष - जोडीदारासोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. आज दिवसभर सावधगिरी न बाळगल्यानं नुकसान होईल. वृषभ- जोडीदारासोबत वाद टाळा. आपले प्रेम व्यक्त करा.यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. संयम बाळगा आणि कठोर परिश्रम करा. मिथुन - प्रवास कंटाळवाणा असेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होईल. कर्क - गोष्टीवर विचार करून कार्य करण्याची गरज आहे. खर्चात वाढ झाल्याने आपल्यासाठी बचत करणे अधिक कठीण होईल. प्रिय व्यक्तीची आठवण येईल. सिंह - दीर्घकालीन समस्या सोडवावी लागेल. नवीन प्रकल्प आणि कार्ये राबविण्याचा एक चांगला दिवस आहे. आज आपल्याला थकवा वाटेल. आजची संध्याकाळ आपल्यासाठी चांगली असेल. हे वाचा-दहावीची परीक्षा आजपासून सुरू, परीक्षा केंद्रावर जाताना या गोष्टी लक्षात ठेवा कन्या - आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करा. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल. दीर्घकालीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यश मिळेल. नवीन योजनांची अमंलबजावणी कराल. तुळ - दीर्घकालीन गुंतवणूक टाळा. मित्रांसोबत वेळ घालवाल. भावनिक होण्यापेक्षा डोक्यानं विचार करून निर्णय घेणं फायद्याचं ठरेल. वृश्चिक - समस्यांचे निराकरण कराल. अनुभवी लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवणे फायद्याचं ठरेल. धनु - मिळवलेल्या पैशांची बचत होणार नाही. प्रेमाचा अनुभव खास असेल. आपली स्पर्धात्मक वृत्ती यशाचे शिखर गाठण्यास मदत करेल. लाईफपार्टनरमुळे आज आपल्याला अस्वस्थता जाणवेल. प्रियजनांचे सहकार्य मिळेल. मकर - दीर्घ मुदतीची गुंतवणूक टाळा आणि आपल्या मित्रांसह बाहेर जा. कोणताही निर्णय घेण्याआधी दोन वेळा विचार करा. आपल्या प्रियकराबरोबर वेळ घालवणे आवश्यक आहे. कुंभ - समस्यांचा सामना करावा लागेल. भूतकाळ विसण्याचा प्रयत्न करा. वर्तमानात भूतकाळाचा त्रास होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या योजना राबवाल. नवीन योजना करण्यावर भर द्याल. आर्थिक नफा मिळेल. प्रवासात सामानाची काळजी घ्या. मीन- अस्थिर स्वभावामुळे पराभवाचा सामना करावा लागले. बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अचानक जबाबदारी आल्यानं आपल्या दिवसात अडथळे निर्माण होऊ शकतात. हे वाचा-चाणक्य नीती – 'या' 7 गोष्टींपासून दोन हात लांबच राहा, नाहीतर समस्यांना सामोरं जा
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या