राशीभविष्य : कन्या आणि वृषभ राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून होणार भरभराट

राशीभविष्य : कन्या आणि वृषभ राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून होणार भरभराट

आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल जाणून घ्या 02 मार्चचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 02 मार्चा : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. कधी आनंद वार्ता घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणामही आपल्यावर होत असतो. त्यामुळे आजचा आपला दिवस कसा असेल? आज आपल्याला काय खबरदारी घ्यावी लागणार आहे जाणून घ्या 02 मार्चचं राशीभविष्य.

मेष - आपल्या सहकारी आणि मित्रांकडून प्रोत्साहन मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ- तणाव आणणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करा. आपल्या प्रिय व्यक्तीची आज आठवण येईल. त्यांच्याशिवाय आज वेळ जाणं कठीण जाईल. चांगली बातमी ऐकायला मिळेल

मिथुन - बाहेर जाण्याच्या योजना आखाल. आर्थिक परिस्थितीमुळे काही कामं अडकू शकतात. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवल्यानं थकवा दूर होईल. विनाकारण धोका पत्करू नका.

कर्क - मित्रांसोबत उत्तम वेळ घालवाल. गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. आजचा दिवसाचा चांगला फायदा घ्या. वेळ वाया घालवू नका.

सिंह - ताण आल्यानं आपलं आरोग्य बिघडू शकतं. मोठ्या योजना आणि कल्पना आखल्या जातील. गुंतवणूक करण्यापूर्वी नीट माहिती घ्या.

कन्या - नकारात्मक विचारांपासू दूर राहा. आज केलेली गुंतवणूक तुमची भरभराट आणि आर्थिक सुरक्षा वाढवेल.

तुळ - आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आज सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घाईनं निष्कर्ष काढू नका. अनावश्यक कामं करणं टाळा त्यातून समस्या उद्भवेल किंवा वेळ वाया जाऊ शकतो.

वृश्चिक - आजचा दिवस ऊर्जेनं भरलेला असेल.  पैसा आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामात व्यस्त दिवस जाईल. पार्टनरची प्रशंसा कराल.

धनु - घाईघाईने निर्णय घेऊ नका, ऑफिसचा ताण घरी आणू नका. ऑफिसमधील अडचणींना सामोरे जावे लागेल.

मकर -  गुंतवणूक करणं हिताची ठरेल. प्रेमाच्या दृष्टीकोनातून हा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे. लेखन कौशल्य असलेल्या व्यक्तीसाठी आजचा दिवस खूप फायद्या मिळवून देईल. लांबचा प्रवास करावा लागेल.

कुंभ - ध्यान आणि योग शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. नव्या आणि सुरक्षित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक कराल. घरातले काही बदल आपल्याला खूप भावनिक बनवू शकतात.नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल.

मीन-घाई-गडबडीत गुंतवणूक करू नका. कितीही राग आला तरी व्यक्त करण्यापेक्षा शांततेचा पवित्रा घ्या. त्यामुळे आपला फायदा झाला नाही तरीही किमान होणारं नुकसान टळेल. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.

First published: March 2, 2020, 7:14 AM IST

ताज्या बातम्या