Home /News /lifestyle /

राशीभविष्य : वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांना आज मिळणार खूशखबर

राशीभविष्य : वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांना आज मिळणार खूशखबर

आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल जाणून घ्या 01 मार्चचं राशीभविष्य.

    मुंबई, 01 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम प्रत्येक दिवसावर होत असतो. अशावेळी आपल्याला आधीच या दिवसातील घडामोडींचा अंदाज असेल तर येणाऱ्यांना तोंड देणं अधिक सोपं जातं. त्यासाठी जाणून घ्या आपल्यासाठी कसा असेल 01 मार्चचा दिवस. मेष - वेगानं होणारं काम आपल्याला ऊर्जा देईल. योग्य वेळी खर्चावर नियंत्रण मिळवलं नाही तर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. सहकाऱ्यांनी कितीही प्रोत्साहन दिलं तरी डोक्यात हवा जाऊ देऊ नका. आपलं काम प्रामाणिकपणे केल्यास भविष्यात मोठा लाभ होईल. वृषभ- दम्याचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी आज विशेष काळजी घ्यावी. घाई-गडबडीत गुंतवणूक करू नका. कितीही राग आला तरी व्यक्त करण्यापेक्षा शांततेचा पवित्रा घ्या. त्यामुळे आपला फायदा झाला नाही तरीही किमान होणारं नुकसान टळेल. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. मिथुन - आज आपण जे बोलाल ते कराल. ताण येईल. पारंपरिक पद्धतीनं गुंतवलेल्या पैशांमधून फायदा होईल. वादातून कधीही विजय होत नाही. त्यामुळे वादविवाद करण्यापेक्षा शांतपणे संभाषणातून आपला विजय मिळवा. कुठल्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, वैवाहिक जीवनात सावध राहा. कर्क - गुंतवणूक करणं हिताची ठरेल. प्रेमाच्या दृष्टीकोनातून हा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे. लेखन कौशल्य असलेल्या व्यक्तीसाठी आजचा दिवस खूप फायद्या मिळवून देईल. लांबचा प्रवास करावा लागेल. हे वाचा-चाणक्य नीती – माणसं ओळखायला चुकू नका, विश्वास ठेवण्याआधी अशी करा व्यक्तीची पारख सिंह - खर्चात वाढ होईल. आज कामापेक्षा आपला छंद जोपासण्यावर भर द्या त्यातून आनंद मिळेल. अनपेक्षितपणे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. जुन्या आठवणी ताजेतवाने होतील. कन्या - ध्यान आणि योग शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. नव्या आणि सुरक्षित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक कराल. घरातले काही बदल आपल्याला खूप भावनिक बनवू शकतात.नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुळ - कामाचा दबाव वाढल्यामुळे आपल्याला मानसिक अस्वस्थता येईल. प्रत्येक गुंतवणूक काळजीपूर्वक करा. अनावश्यक नुकसान टाळण्यासाठी योग्य सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. प्रिय व्यक्तीपासून दूर असण्याचे दु: ख आपल्याला सतत त्रास देईल. महिला आपल्या आयुष्यात आज यशस्वी भूमिका बजावतील. वृश्चिक - आर्थिक लाभ मिळेल. नातेवाईक आपल्या उदार स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. अशा नातेवाईक, मित्रांपासून सावधगिरी बाळगा. धनु - मानसिक ताण दूर करण्यासाठी आधात्मात मन गुंतवणं हिताचं ठरेल. आपला खर्च जास्त वाढवू नका. आज आपल्याला एकटेपणा जाणवेल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी पुस्तक वाचा, मनोरंजनाच्या साधनांचा वापर करा. मकर - वैवाहिक जीवनात आजचा दिवस चांगला जाईल. विविध स्त्रोतांपासून आपल्याला आर्थिक लाभ मिळेल. आज लोक आपली प्रशंसा करतील. कुटुंबियांसोबत अति जास्त वेळ घालवणं आपल्याला त्रासदायक ठरू शकतं कारण कौटुंबिक वातावरणातून उद्भवणारा ताण त्रासदायक ठरेल. कुंभ - दीर्घ काळापासून असलेल्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा भविष्यात मोठी समस्या उद्भवू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला काही काळ विसरावं लागू शकतं. आपल्या भोवती घडणाऱ्या घडामोडींकडे नजरअंदाज करू नका. मीन-तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल. बरेच लोक तुमची खूप प्रशंसा करू शकतात दिवसाच्या दुसर्‍या भागात आर्थिक फायदा होईल. मित्रांसोबत वेळ घालवाल. वादात अडकल्यास आपलं मत सांगणं टाळा. हे वाचा-दररोज दूध पिताय सावधान ! हाडं मजबूत ठेवणाऱ्या दुधामुळे होतोय जीवघेणा आजार
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope

    पुढील बातम्या