मुंबई, 15 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. दिवसातील येणारी आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना आपल्याला असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 15 मेचा दिवस कसा असेल.
मेष - मानसिक शांततेचा भंग होईल. पैसे कमवण्याची आज तीव्र इच्छा होईल. जोडीदारासोबत संवाद साधाल. योगासन आणि अभ्यास यातून आपलं मन एकाग्र करू शकता.
वृषभ- घाईत गुंतवणूक करू नका. स्वार्थी वागण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल.
मिथुन- खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्या. दिवस पुढे सरकेल तशी आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या जवळचे लोक आपला गैरफायदा घेतील. ताण घेऊ नका.
कर्क- वचनबद्ध होऊ नका शक्य तेवढी मदत करा. तणावामुळे निराशा येईल. आपल्या प्रिय व्यक्ती आणि कुटुंबीयांसोबत आज आपले वाद होऊ शकतात.
सिंह - ताण आल्यानं मानसिक शांतता भंग होईल. जीभेवर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस चांगला असेल केवळ आपण संयम राखणं आणि शांत राहाणं गरजेचं आहे.
हे वाचा-लहान मुलांना ज्युस देताना काळजी घ्या, 'या' वयापर्यंत ज्युस बिलकुल देऊ नका
कन्या- जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रार्थनेतून आपली इच्छा पूर्ण होईल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. विमा संबंधित विषयांकडे लक्ष द्या.
तुळ- आरोग्य आणि भविष्यातील योजनांबाबत सावधिगीरीनं पावलं उचला. आर्थिक चणचण जाणवेल. अचानक नवीन जबाबदारी आपल्याकडे सोपवल्यानं अडथळा येईल. स्वत:साठी कमी वेळ मिळेल.
वृश्चिक- आर्थिक व्यवहारासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तांसोबत आजचा आपला दिवस चांगला जाईल. वाचन आवश्यक आहे.
धनु- भावनिकदृष्ट्या आपल्या मनामध्ये संभ्रम असेल. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. जोडीदाराच्या वागण्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
मकर- आजचा दिवस आपल्याकडे कामाचा ताण असला तरी दिवस चांगला जाईल. आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. भावनांवर नियंत्रण ठेवा.
कुंभ- शरीर आणि मन दोन्हीचं स्वस्थ जपणं आपल्यासाठी फायद्याचं ठरेल. अनावश्यक खर्च टाळा. परिस्थितीचा सामना करा पळ काढू नका.
मीन- तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करा. प्रिय व्यक्तींच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करा. आज आपल्या कामातून फायदा मिळेल.
हे वाचा-तुम्हीही तुमच्या मर्जीने डाएट करता का? मग 'हे' वाचाच
संपादन- क्रांती कानेटकर