राशीभविष्य : मेष आणि कुंभ राशीच्या लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 8 एप्रिलचं राशीभविष्य

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 8 एप्रिलचं राशीभविष्य

  • Share this:
    मुंबई, 08 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्या दिवसातील आव्हानं कोणती याचा आधीच अंदाज आला तर सामना करणं आधीच सोप होऊन जातं. त्यात आहे आज चैत्र पैर्णिमा त्यामुळे आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीवर कसा होणार आहे जाणून घ्या आजचं राशीभविष्य. मेष - जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत विनाकरण लक्ष घालणं टाळा. पैसे जास्त खर्च होणार नाहीत याकडे लक्ष द्या. प्रामाणिक प्रयत्नांनी य़शाचा मार्ग सोपा होईल. सतत्यानं अडचणींचा सामना करावा लागेल. वृषभ- आशावादी व्हा, आपला विश्वास आणि आशा नवीन संधीचे दरवाजे उघडण्यास मदत करतील. दिवसाचा उत्तरार्ध तुम्हाला आर्थिक फायदा होईल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस शुभ आहे. मिथुन - प्रिय व्यक्तीला पुरेस वेळ न दिल्यास वाद होतील. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्या जवळ जा. आळस हा माणसाचा शत्रू आहे त्यामुळे तो झटकणं आवश्यक आहे. कर्क - ध्यान आणि योग शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. पार्टनरसोबत असलेला तणाव दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वेळेचा सद्उपयोग करा. सिंह - लोकांना दिलेलं जुनं कर्ज, उधारीचे पैसे आज पुन्हा आपल्याकडे येतील. प्रेमात अखंड बुडालेल्यांची झोप उडेल. हे वाचा-ब्रेड, बिस्कीटमुळे पसरतो कोरोनाव्हायरस? WHO च्या फोटोमागचं तथ्य काय? कन्या - खाण्या-पिण्याची काळजी घ्या.र्लक्ष हे आजाराचे कारण असू शकते. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस आहे. जोडीदाराशी भांडण केल्यास मानसिक ताण येऊ शकतो. तुळ - म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्तला कोणतंही वचन देणं आज टाळा. आज आपल्यासाठी मानसिक शांतता महत्त्वाची आहे. वृश्चिक - खर्चात वाढ होईल. मित्रा परिवाराच्या अवास्तव मागण्यांना बळी पडू नका. सर्जनशील क्षमतांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होईल. चांगल्या कामांमध्ये थोडा वेळ घालवला तर आपण बर्‍याच सकारात्मक बदल आणू शकता. धनु - आर्थिक चणचण सहन करावी लागेल. सावधगिरीचा अभाव आपल्याला नुकसान पोहोचवू शकतो. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. गैरसमजांमुळे आपल्या पार्टनरसोबत वाद होतील. मकर - कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट करू नका. आज केलेल्या गुंतवणूकीमुळे तुमची भरभराट होईल आणि आर्थिक सुरक्षा वाढेल. कुंभ- अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. करमणूक, मनोरंजनावर फार वेळ वाया न घालवणं हिताचं ठरेल. प्रिय व्यक्तींसोबत मतभेद होतील. आजचा दिवस चांगला आणि आनंदी असेल. जोडीदाराचा चांगला स्वभाव आपल्याला दिसेल अनेक गैरसमज दूर होतील. मीन- आजचा आपला दिवस कामांमध्ये व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. हे वाचा-कोबीवर सर्वात जास्त वेळ राहतो कोरोना; WHO च्या नावाने मेसेज व्हायरल संपादन- क्रांती कानेटकर.
    First published: