Home /News /lifestyle /

माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून चोरीला गेलं झाड; किंमतच अशी होती की पोलिसांची फौजफाट्यासह घेतला शोध

माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून चोरीला गेलं झाड; किंमतच अशी होती की पोलिसांची फौजफाट्यासह घेतला शोध

माजी पोलीस महासंचालकांच्याच घरातून चोरट्यांनी एका दुर्मिळ बोन्साय झाडाची (Rare bonsai tree) चोरी केली. या झाडाची अंदाजे किंमत ऐकून तुम्हीही चक्रावाल.

    हैदराबाद, 15 जानेवारी: अलिकडच्या काळात चोरट्यांचा चोरी करण्याचा एक नवीन ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. हे चोरटे थेट पैसा किंवा सोन्याची चोरी करत नसून बहुमोल आणि किमती दुर्मिळ वस्तु चोरत आहेत. नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणांत चोरट्यांनी एका दुर्मिळ बोन्साय झाडाची (Bonsai tree) चोरी केली आहे. हे झाड 15 वर्ष जुनं असून 'कासुअरिना' (Casuarina) असं या झाडाचं नाव आहे. या झाडाची चोरी एका माजी पोलीस महासंचालकांच्या घरातून सोमवारी झाली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हे झाड चोरलं आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या झाडाची अंदाजित किंमत दीड लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सदर घटना हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात घडली आहे. माजी पोलीस संचालक व्ही आप्पा राव यांच्या घरात असलेल्या 15 वर्ष जुन्या 'कासुअरीना' या दुर्मिळ बोन्साय झाडावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी  दोघाला अटक केली आहे. बागकाम करणारी व्यक्ती झाडांना पाणी देण्यासाठी आल्यानंतर, हे संबंधित बोन्साय झाड गायब असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यानंतर या झाडाच्या चोरीची तक्रार पोलिसांत दिली. व्ही आप्पा राव यांच्या घरी बसवलेले दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नव्हते, त्यामुळे चोरांना पकडणे सुरुवातीला कठीण गेलं. मात्र रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांना हे झाड घेवून जाताना दिसलं. त्यानंतर पोलिसांनी सार्वजनिक कॅमेऱ्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढला आहे. गोल्लापुडी प्रसन्नाजनेयुलु आणि अभिषेक अशी आरोपींची नावं आहेत. यामध्ये प्रसन्नाजनेयुलुला अटक करण्यात आली आहे, अभिषेक अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपींकडून हे दुर्मिळ झाडं सुरक्षितपणे परत मिळवलं आहे. बोन्साय झाड म्हणजे काय? बोन्साय झाडं दुर्मिळ, विदेशी आणि महाग असतात. ही झाडं कृत्रिम पद्धतीनं उगवली जातात. त्यामुळे अशा झाडांची विशेष काळजी घेणे आवश्यक असतं. ही झाडं दोनशे ते तीनशे वर्षे आरामात जगू शकतात. बोन्साय झाड हे साधारणतः एखाद्या मोठी अवाढव्य वृक्षाची छोटी प्रतिकृती असते. त्यामुळं अशी झाडं दुर्मिळ असून बाजारात त्याची किंमत खुप जास्त असते. झाड जितकं जुनं असतं, त्याची किंमत तेवढी अधिक असते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या