Home /News /lifestyle /

कोजागिरीच्या रात्री दिसणार BLUE MOON; पुन्हा 3 वर्षांनंतरच येणार असा योग

कोजागिरीच्या रात्री दिसणार BLUE MOON; पुन्हा 3 वर्षांनंतरच येणार असा योग

याआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली BLUE MOON दिसला होता. यानंतर तो तीन वर्षांनंतर 2023 साली दिसेल. त्यामुळे ब्ल्यू मून पाहण्याची संधी सोडू नका.

    मुंबई, 29 ऑक्टोबर : कोजागिरीची रात्र म्हणजे जागरणाची रात्र. लख्खं अशा चंद्राच्या प्रकाशात कोजागिरी साजरी केली जाते. कोजागिरीच्या रात्रीचा चंद्र (MOON) खूपच सुंदर दिसतो. मात्र यंदाच्या कोजागिराचा चंद्र अधिक खास असणार आहे. कारण कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र साधा नाही तर ब्ल्यू मून (BLUE MOON) असणार आहे. येत्या शनिवारी म्हणजे 31 ऑक्टोबरला ब्ल्यू मूनचा (Blue Moon) योग आहे. याआधी 31 मार्च 2018 ला ब्ल्यू मून दिसला होता, आता दोन वर्षांनी म्हणजे 31 ऑक्टोबर 2020 ला दिसणार आहे आणि त्यानंतर तो 3 वर्षांनंतर म्हणजे 31 ऑगस्ट 2023 ला दिसेल. त्यामुळे यंदा कोजागिरीच्या दिवशी ब्ल्यू मून पाहण्याचा चांगला योग आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं, 30 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी अश्विन पौर्णिमा सुरू होईल. त्या दिवशी मध्यरात्री अश्विन पौर्णिमा असल्यानं त्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची असते. त्यामुळे यंदाच्या कोजागिरीचा चंद्र हा ब्ल्यू मून असणार आहे. शनिवारी 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजून 18 मिनिटांनी अश्विन पौर्णिमा संपते" ब्ल्यू मून म्हणजे काय? ब्ल्यू मून म्हणजे तो नावाप्रमाणे निळ्या रंगाचा चंद्र असं होतं. मात्र त्याचा रंगाशी काही संबंध नाही. एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणतात. ब्ल्यू मून  प्रत्येकी दोन किंवा तीन वर्षांनी पाहायला मिळतं. हे वाचा - झाडांमधून झुलता पूल; PHOTO पाहाल तर 'द ग्रेट वॉल ऑफ चायना'लाही विसराल मुंबईतील नेहरू सेंटरमधील नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्ल्यू मून म्हणजे त्याचा रंगाशी संबंध नाही. पण पृथ्वीवरून सूर्य-चंद्र पाहताना वातावरणामुळे आपल्या डोळ्यांना रंग बदल दिसून येतात. ब्ल्यू मून म्हणजे एकाच इंग्रजी महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसणं. दुसऱ्या चंद्राला ब्ल्यू मून असं म्हटलं जातं. सामान्यपणे वर्षाला 12 पूर्ण चंद्र दिसतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक पूर्ण चंद्र असतो. या पद्धतीनं सांगायचं तर वर्षाला 12 ऐवजी 13 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पूर्ण चंद्र दिसतो." हे वाचा - खाण्यासाठी काय करायचं याचं उत्तर देणार टेबलक्लॉथ; साहित्य ओळखून सूचवणार पदार्थ "फेब्रुवारीमध्ये कधीच ब्ल्यू मून दिसत नाही कारण हा महिना लहान असतो. तसंच 30 दिवसांचा महिना असल्यासही ब्ल्यू मून दिसणं दुर्मिळ आहे. 30 दिवसांच्या महिन्यात याआधी 30 जून 2018 ला ब्ल्यू मून दिसला होता आणि आता 30 सप्टेंबर 2050 ला दिसेल. 31 दिवसांचा विचार करता 2018 साली दोन ब्ल्यू मून दिसले होते. एक 31 जानेवारी आणि दुसरा 31 मार्च, 2018 रोजी. आता 31 ऑक्टोबर, 2020 नंतर  31 ऑगस्ट 2023 ला पुढचा ब्ल्यू मून दिसेल", असं परांजपे यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या