Home /News /lifestyle /

गानकोकिळा लतादीदी, अनिल बिस्वास आणि वनस्पती डालडा! काय आहे या भन्नाट फोटोची गोष्ट?

गानकोकिळा लतादीदी, अनिल बिस्वास आणि वनस्पती डालडा! काय आहे या भन्नाट फोटोची गोष्ट?

Lata Mangeshkar Rare Photo: आवडत्या गायिकेचं हे साधंसुधं घरगुती रूप तुम्ही नक्कीच कधी पाहिलं नसेल.

    मुंबई, 31 मार्च : फोटो, मग ते कृष्णधवल असोत की रंगीत, भूतकाळ कायमचा जपून, स्टोअर करून ठेवण्यासाठी मोलाचे असतात. एखादी सामान्य व्यक्ती असो की जगभर ओळख मिळवलेली कुणी सेलिब्रिटी, सगळ्यांनाच स्वतःच्या फोटोंमध्ये रमण्याचा नॉस्टॅल्जिया आवडतो. (Viral photo) मात्र फोटो सेलिब्रिटीचा असेल तर त्याच्या असंख्य चाहत्यांना, रसिकांनाही त्यात रमायला आवडतं. असाच दोन प्रतिभावंत सेलिब्रिटीजचा एकदमच हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Lata Mangeshkar rare photo) हे सेलिब्रिटी म्हणजे गानकोकिळा हे सार्थ बिरूद मिरवणाऱ्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि प्रतिभावंत संगीतकार अनिल बिस्वास. कलेच्या क्षेत्रात मोठीच लोकप्रियता आणि मान्यता मिळवलेली ही दोन व्यक्तिमत्त्वं. आपण यांच्या अद्भुत गायनाचा, संगीताचा आस्वाद घेतला असेल. विविध सार्वजनिक समारंभातले किंवा गाण्याच्या रिहर्सलदरम्यानचे यांचे फोटोजही आजवर खूप पाहिले असतील.   (Anil Biswas cooking with lata rare photo) मात्र हा फोटो हटके आहे खरा. असं काय आहे यात? तर यात एरवी वाद्य, ताल, लय यांच्यात गुंतलेले अनिलदा चक्क फरशीवर बसून कोळशाची असावी असं वाटणाऱ्या शेगडीवर स्वयंपाक करत आहेत. एक मोठं भांडं, त्यात काहीतरी खाद्यपदार्थ आहे. अनिलदा तो मन लावून ढवळत आहेत. अनिलदांच्या अंगावर केवळ लुंगी आहे. अगदी तरुण, कोवळ्या वयातल्या लतादीदी त्यांच्या बाजूलाच फरशीवर बसून गालावर हात ठेवत अनिलदांचं पाककौशल्य मग्न होऊन पाहत आहेत. लतादीदी साध्याशा साडीत आहेत. (black and white rare photo of lata Didi and anil biswas) हेही वाचा गायकाचा कार अपघातात मृत्यू; दोन दिवसांनी येतोय नवा अल्बम बाजूलाच दुसऱ्या तशाच शेगडीवरच्या पातेल्यात अजून एक महिला काहीतरी ढवळते आहे. तिच्या चेहऱ्यावर आहे हलकंसं हसू. ही महिला म्हणजे पंजाबी अभिनेते एस डी नारंग यांची पत्नी स्मृती नारंग आहेत असं सांगण्यात आलं आहे. शिडशिडीत अंगकाठीच्या, बॉब कट केलेल्या स्मृती यांनीही साडी नेसली आहे. आसपास काही कदाचित जर्मनची असावीत अशी काहीबाही साहित्य असलेली पातेली आणि एकदोन डबे आहेत. त्यातले वनस्पती घी डालडाचे एकदम जुन्या काळात असायचे ते दोन टिन ठळकपणे आपलं लक्ष वेधून घेतात. त्याच्यावरचं प्रसिद्ध नारळाच्या झाडाचं चित्रही फोटोत दिसतं. (face book rare photo of lata mangeshkar) हेही वाचा ‘कुटुंबीयांसाठी मी पैसे कमवण्याचं मशीन होते’; रिमी सेनचा खळबळजनक खुलासा राज्यसभा टेलिव्हिजन या चॅनलवर आपल्या सुरेख शैलीत अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना 'गुफ्तगू' या खास मुलाखतीच्या कार्यक्रमातून उलगडणारे ज्येष्ठ पत्रकार सय्यद मोहम्मद इरफान यांनी आपल्या टाइमलाईनवर हा फोटो शेअर केला आहे. Tabasco  Tongue या  फेसबुक पेजवरचा मूळ फोटो त्यांनी शेअर केला आहे.आपल्या आवडत्या कलावंतांचं हे साधं, घरगुती रूप पाहून चाहते भारावून जात प्रतिक्रिया देत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Facebook

    पुढील बातम्या