मुंबई, 22 जानेवारी : मूड स्विंग (Rapid Mood Swings) हा एक बायोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे शारीरिक आजार आहे. हा आजार झाल्यावर माणसाच्या मेंदूत रासायनिक असंतुलन होतं. त्यामुळे मूड स्विंगचा आजार असलेली व्यक्ती कधी खूपच आनंदी असते, तर कधी अगदी हतबल होते. रक्तातल्या कार्टिसॉल या ताणात वाढ झाली किंवा थायरॉइड असंतुलित झालं तर सारखे मूड बदलतात. पुरूष असो किंवा महिला कुणालाही हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो.
मूड स्विंग या आजाराकडे आपल्यात खूपच दुर्लक्ष केलं जातं. पण अशा व्यक्तींच्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार येतो त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला हवी. मूड स्विंग कधीकधी जास्त काळही राहू शकतो. मूड स्विंग झाल्यावर माणूस गरज नसताना वस्तू खरेदी करतो किंवा विनाकारण लोकांशी गप्पा मारत बसतो. जर तुम्हाला यापैकी काही लक्षणं तुमच्यात जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. जर मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असतील, तर राष्ट्रीय आत्महत्या रोखण्यासाठीच्या लाइफलाइनवर 1-800-273-8255 फोन कॉल करून अडचण सांगू शकता. तिथे योग्य सल्ला दिला जाईल. ही लाइफलाइन 24 तास सुरू असते.
मानसिक आरोग्याचे प्रकार -
मनाच्या अनेक परिस्थिती या मूड बदलाला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे मूड डिसऑर्डरबद्दल heathline वेबसाइटवरील रिपोर्टच्या आधारे जाणून घेता येईल.
बायपोलर डिसऑर्डर (Bipolar Disorder) -
जर तुम्हाला बायपोलर डिसऑर्डर असेल तर तुम्ही कधीतरी अत्यंत आनंदी, तर कधी अत्यंत दु:खी असू शकता. पण हे मूड स्विंग साधारणपणे वर्षात काही वेळा येतात.
सायक्लोथॅमिक डिसऑर्डर (Cyclothymic disorder) -
सायक्लोथॅमिक डिसऑर्डर किंवा सायक्लोथायमिया, मूड स्विंगचा एक साधाच प्रकार आहे. यात अनेकदा व्यक्तीच्या मनातील भावना एकदम वर-खाली होतात पण हा आजार बायपोलर डिसऑर्डर इतका गंभीर नाही.
मेजर डिप्रेसिव बायपोलर डिसऑर्डर (Major depressive disorder, MDD) -
एमडीडी झालेली व्यक्ती दीर्घकाळ दु:खात राहते. एमडीडीला कधीकधी क्लिनिकल डिप्रेशन म्हटलं जातं.
डिस्टिमिया (Dysthymia) -
डिस्टिमिया, याला पर्वेजिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स (पीडीडी) म्हणतात, या उदासीनतेचा खूप गंभीर परिणाम होतो.
पर्सनॅलिटी डिसऑर्डर -
काही पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये, कमी काळात जास्त मूड स्विंग होतात.
विघटनकारी मनस्थिती विकृती (Disruptive mood dysregulation disorder, DMDD) -
DMDD हा आजार सामान्यपणे लहान मुलांमध्ये दिसून येतो. ज्या मुलांना हा आजार होतो त्यांचं वय वाढलं तरीही त्यांचा शारीरिक मानसिक विकास कमी वेगाने होतो.
हॉर्मोनमधील बदल -
हॉर्मोन्स मूड स्विंगसाठी कारणीभूत ठरू शकतात. वयात आलेली मुलगी, गर्भवती महिला आणि मेनोपॉज सुरू असलेल्या महिलेच्या शरीरातील हॉर्मोनमध्ये बदल होत असतो. त्या बदलांमुळे त्यांना काही काळ मूड स्विंग होऊ शकतो. याशिवाय ताण, आयुष्यात अनपेक्षित मनाविरुद्ध घडलेल्या घटना, आहार, झोपेच्या सवयी आणि औषधं यामुळेही मूड स्विंग होऊ शकतात. त्यामुळे आपण आपलं दैनंदिन जीवन आखून घ्यावं आणि ते पाळावं हे खूपच महत्त्वाचं आहे. व्यायाम करा, खूप पाणी प्या आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेत रहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips