No Shave November फॉलो करत आहात? या सेलिब्रिटींच्या दाढीची स्टाइल आहे ट्रेंडमध्ये

No Shave November फॉलो करत आहात? या सेलिब्रिटींच्या दाढीची स्टाइल आहे ट्रेंडमध्ये

नो शेव्ह नोव्हेंबर (No-Shave November) दरम्यान तुम्ही या सेलिब्रिटिंच्या दाढीच्या स्टाईल्स फॉलो करू शकता.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर: नो-शेव्ह नोव्हेंबर हा ट्रेंड फॉलो करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात पुरुष मंडळी दाढी न करण्याची प्रतिज्ञा घेतात. कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणे या उद्देशासाठी हा उपक्रम केला जातो. कर्करोगग्रस्त पुरुषांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी नो-शेव्ह नोव्हेंबरचं अभियान जगभर फॉलो केलं जातं. या काळात मोठ्या प्रमाणात रेझर, क्लीपर किंवा कात्रीचा वापर टाळून पुरुष मंडळी त्यांचे केस आणि दाढी वाढवतात.

नो शेव्ह नोव्हेंबर (No-Shave November) दरम्यान तुम्ही या सेलिब्रिटिंच्या दाढीच्या स्टाईल्स फॉलो करू शकता.

रणवीर सिंग

रणवीरची (Ranveer Singh) दाढी काहीशी रफ आणि माचो लुक देणारी आहे. अशा दाढीची देखभाल करणं आव्हानात्मक असू शकतं. तुम्ही जर असा लुक करणार असाल तर दाढीच्या देखभालीसाठी आवश्यक तेल आणि इतर संसाधनांचा वापर (Beard Wash and Beard Oil) करू शकता.

View this post on Instagram

☯️

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

शाहिद कपूर

कबीर सिंग चित्रपटातील शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) दाढीचा लुक खूपच व्हायरल झाला होता. या लुकला एकदम राकट आणि Badass टच होता. हा लुक ठेवण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न जरूर करावे लागतील. दाढी धुण्यासाठी फेसवॉश आणि योग्य ट्रिमरसारख्या वस्तू वापरून तुम्ही असा लुक करू शकता.

सैफ अली खान

सैफ अली खानसारखी (Saif Ali Khan) परफेक्ट Bandholz स्टाईल ठेवण्यासाठी तुम्हाला सौंदर्य प्रसाधनांची मदत घ्यावी लागेल. त्याकरता अपेक्षित लांबी आणि व्हॉल्यूम इतकेच केस चेहऱ्यावर वाढू द्यावेत. या स्टाइलबरोबर मॅनबन किंवा अंडरकट केसांची स्टाइल चांगली दिसते. सुनील शेट्टी आणि विकी कौशलवरही याप्रकारची स्टाइल खुलून दिसते. रणदीप हूडानेही अलीकडच्या काळात हा लुक ठेवला होता.

आयुष्मान खुराना

आयुष्मानची ही स्टाइल Van Dyke म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये हनुवटीवर छोटी दाढी आणि मिशी असते. अशाप्रकारे जर तुम्ही Elegant अशा लुकच्या शोधात असाल तर आधी मोठी दाढी ठेवून नंतर दाढीला आकार देता येईल. या स्टाईलला लोकप्रिय करण्याचं श्रेय जॉनी डेपला जातं. ख्रिश्चन बेल आणि विक्की कौशलही ही स्टाईल फॉलो करत आहेत.

विराट कोहली

विराट कोहलीची बारीक कापलेली दाढीची स्टाईल ही सुद्धा प्रसिद्ध आहे. ह्या स्टाईलची दाढी अगदीच कमी पण नाही आणि अगदीच जास्त मोठी देखील वाटत नाही. ही स्टाईल ठेवण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या ट्रीमरची गरज लागेल, त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे ही स्टाईल करू  शकता.

तुम्ही देखील या स्टाइल करून ट्रेंड फॉलो करू शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 5, 2020, 8:07 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या