Home /News /lifestyle /

रणवीर सिंह आहे दीपिकाचा नंबर वन फॅन; बायकोची वेबसाईट लाँच होताच काय म्हणाला पाहा

रणवीर सिंह आहे दीपिकाचा नंबर वन फॅन; बायकोची वेबसाईट लाँच होताच काय म्हणाला पाहा

दीपिकाने नुकतीच स्वतःची एक्सक्लुसिव्ह वेबसाईट (Deepika padukone Website) लॉन्च केली आहे. याविषयी तिनं सांगितलं की ही वेबसाईट म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाचं अजून एक प्रतिबिंब आहे.

नवी दिल्ली, 10 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) नंबर वन फॅन हा तिचा पती आणि लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh)आहे. रणवीर आणि दीपिका सातत्याने एकमेकांविषयी आपलं प्रेम व्यक्त करीत असतात. हल्लीच्या लाइफस्टाइल भाषेत याला पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन (PDA) असं म्हणतात. दीपिका आणि रणवीरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होतात. नुकतीच रणवीर सिंहने पत्नी दीपिकासाठी प्रेम व्यक्त करणारं एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यानं पुन्हा एकदा दीपिकावरील प्रेम व्यक्त केलं आहे. दीपिकाने नुकतीच स्वतःची एक्सक्लुसिव्ह वेबसाइट (deepika padukone Website) लाँच केली आहे. याविषयी तिनं सांगितलं की, ही वेबसाईट म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाचं अजून एक प्रतिबिंब आहे. या गोष्टीचं आणि दीपिकाचं रणवीर याने खूप कौतुक करत एक पत्र लिहिलं आहे. या पत्रानं फॅन्सचं देखील लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये रणवीरने स्वतःला प्राऊड पती (Proud Husband)घोषित केलं आहे. रणवीर या पत्रात लिहितो, की मी आतापर्यंत जगभरातील जितक्या लोकांना भेटलो त्यात सर्वांत केवळ तू सुंदर माणूस आहेस. तु माझी पत्नी आहेस म्हणून मी हे म्हणत नाही तर तुझ्यामध्ये अवघं विश्व सामावलेलं आहे. प्रेम,करुणा,दया,बुध्दी,सुंदरता आणि सहानुभूती हे सर्व गुण तुझ्यात आहेत. या सर्व गुणांमुळेच तु एक चांगली आणि खरी कलाकार आहेस. तु जगातील सर्वात्तम कलाकारांपैकी एक आहेस. तुझ्यात धैर्य आणि इच्छाशक्ती आहे. एक अदभुत व्यक्तिमत्व असल्याबद्दल मी तुझं कौतुक करतो. मी या जगातील प्राऊड पती आहे. ‘तुला अंतर्वस्त्र पाठवू का?’; अनुषा दांडेकरनं ट्रोलर्सची बोलती केली बंद रणवीर व्यतिरिक्त फराह खान (Farah Khan) आणि डिझाईनर सब्यासाचीने (Sabyasachi)देखील दीपिकाच्या कामाचे कौतुक करीत आपला अनुभव शेअर केला आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण 2018 मध्ये विवाहबध्द झाले होते. लवकरच हे दोघं कबीर खान दिग्दर्शित 83 या चित्रपटात दिसणार आहेत. अब्जाधीश व्यवसायिकाला अभिनेत्रीचा नकार; मालिकेत काम करण्यासाठी मोडलं लग्न माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यात कपिल देव यांची भूमिका रणवीर साकारत असून दीपिका कपिल यांच्या पत्नीची भूमिका करीत आहे.
First published:

Tags: Bollywood News, Deepika padukone, Ranveer singh

पुढील बातम्या