• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Rani Laxmibai Birth Anniversary: आईवडिलांची लाडकी 'मनू' कशी झाली झाशीची नायिका

Rani Laxmibai Birth Anniversary: आईवडिलांची लाडकी 'मनू' कशी झाली झाशीची नायिका

झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Laxmibai) खरच खूप शूर होती का? की मग कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांच्या 'खूब लडी मर्दानी वो झांसी वाली रानी थी' या कवितेतील ओळी अतिशयोक्ती आहे का? अवघ्या 29 वर्षीय महिलेने बलाढ्य इंग्रजी सैन्याला कसं आव्हान दिलं?

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : Rani Laxmibai Birth Anniversary: 'मी माझी झाशी देणार नाही' हे वाक्य आपल्या शालेय जीवनात प्रत्येकाने ऐकलं किंवा वाचलं असेल. झाशीच्या राणीने (Queen of Jhansi) आपल्या काळात दाखवलेले शौर्य अतुलनीय आहे. ना भुतो ना भविष्य अशी तिची कारकीर्द होती. तिच्या बालपणीच्या परिस्थितीने तिला लष्करी प्रशिक्षण घ्यायला भाग पडलं. मात्र, यात तिची आवड आणि साहस यांची महत्वाची भूमिका होती. पतीच्या निधनानंतर त्यांनी विधवेचे जीवन जगण्यापेक्षा योद्ध्याचे (Warrior) जीवन निवडले. त्यांचे हेच जीवन आजपर्यंत प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी दाखवलेल्या शौर्याची शत्रूंनाही भुरळ पडल्याशिवाय राहिली नाही. आज 19 नोव्हेंबरला त्यांची जयंती देशभर साजरी होत आहे. याच निमित्ताने मर्दानी झाशीच्या राणीचा जीवन परिचय जाणून घेऊया. झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Laxmibai) खरच खूप शूर होती का? की मग कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांच्या 'खूब लडी मर्दानी वो झांसी वाली रानी थी' या कवितेतील ओळी अतिशयोक्ती आहे का? अवघ्या 29 वर्षीय महिलेने बलाढ्य इंग्रजी सैन्याला कसं आव्हान दिलं? विरोधकांनाही आपल्या पराक्रमाची खात्री पटवून देणं हे काही खायचं काम नाही. शेवटी असे काय होते जे देशातील अनेक संस्थानांचे राजे करू शकले नाहीत, जे राणी लक्ष्मीबाईने केले. ज्या देशात महिलांनी शस्त्र उचलणे ही मोठी गोष्ट मानली जाते, त्या देशात झाशीच्या राणीने असे लढाऊ कौशल्य कसे दाखवले? वडिलांकडून पालनपोषण राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसीतील मराठी कराडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथी सप्रे होते. लक्ष्मीबाईंचे माहेरचं नाव मणिकर्णिका तांबे होते. पण, त्यांना सर्वजण प्रेमाने मनू म्हणत. त्या फक्त चार वर्षांच्या असताना त्यांच्या आई निधन झालं. परिणामी त्यांचे पालनपोषण त्याच्या वडिलांनी केले. पेशव्यांनी मुलीसारखं शिक्षण दिलं मोरोपंत तांबे बिठूरच्या मराठा बाजीराव पेशव्यांच्या दरबारात काम करत होते. मोरोपंत मनूला बरोबर घेऊन दरबारात जायचे, जिथे पेशवे तिला आपली मुलगी मानायचे आणि तिला प्रेमाने छबिली म्हणत. येथेच त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी ही कौशल्ये आत्मसात केली. या ठिकाणी मणिकर्णिकाला सर्व शिक्षण मिळाले जे त्या काळात महिलांना उपलब्ध नव्हते. 1947 मध्ये कोणती लढाई लढलो होतो? स्वातंत्र्याच्या विधानानंतर कंगनाचा नवा सवाल विवाह आणि मुलगा मनू घरीच लिहायला वाचायला शिकली. नानासाहेब आणि तात्या टोपे हे त्यांचे बालपणीचे मित्र. त्या नेमबाजी आणि मल्लखांब खेळण्यातही तरबेज झाल्या. मणिकर्णिका यांचा विवाह झाशीचे महाराज गंगाधर राव नेवाळकर यांच्याशी 1842 मध्ये झाला. लग्नाच्या दिवशीच त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. 1851 मध्ये त्यांना एक मुलगा देखील झाला जो त्याच्या जन्मानंतर चार महिन्यांनी मरण पावला. महाराज गंगाधर यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्या चुलत भावाचा मुलगा आनंद राव, याला दत्तक घेतले, ज्याचे नाव दामोदर राव होते. वारस स्वीकारण्यास नकार पती गंगाधर यांच्या निधनानंतरच लक्ष्मीबाईंच्या सैन्य आणि राज्यकारभाराच्या शिकवणुकीची परीक्षा सुरू झाली. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या धोरणानुसार ईस्ट इंडिया कंपनीने दत्तक मुलाला वारस म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. हा इंग्रजांचा युक्तिवाद मानण्यास राणीने नकार दिला आणि इंग्रजांना ती झाशी देणार नाही असे सडेतोड उत्तर दिले. यामुळे इंग्रज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यातील युद्ध निश्चित झाले, ज्यासाठी राणी देखील तयार होती. झाशीतील पहिले युद्ध 23 मार्च 1858 रोजी इंग्रजांनी झाशीवर हल्ला केला आणि 3 एप्रिलपर्यंत भयंकर युद्ध झाले, ज्यात तात्या टोपे यांनी राणीला साथ दिली, त्यामुळे ब्रिटीश 13 दिवस झाशीत प्रवेश करू शकले नाहीत. शेवटी 4 एप्रिल रोजी ब्रिटिशांनी झाशीत प्रवेश केला आणि राणीला झाशी सोडावी लागली. राणी एकाच दिवसात काल्पीला पोहोचली, जिथे त्यांना नानासाहेब पेशवे, रावसाहेब आणि तात्या टोपे यांचा पाठिंबा मिळाला. मग ते सर्वजण ग्वाल्हेरला पोहोचले जिथे निर्णायक लढाई झाली. अंतिम पण निर्णायक लढाई 17 जून रोजी राणी लक्ष्मीबाईची शेवटची पण ऐतिहासिक लढाई सुरू झाली. हुरोजच्या नेतृत्वाखाली राणी लक्ष्मीबाईला इंग्रजांनी वेढले होते. लढताना राणीला गोळी लागली, त्यानंतर ती विश्वासू सैनिकांसह बाहेर पडली. त्याचा पाठलाग करत असताना एका ब्रिटीश सैनिकाच्या तलवारीने त्यांच्या डोक्यावर वार केला, पण इंग्रजांच्या हाती त्यांचा मृतदेह लागू नये म्हणून त्यांच्या मित्रांनी दूर नेत लगेचच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल. पण ब्रिटीश सैनिक आणि सेनापतींना राणीच्या शौर्याची खात्री पटली होती. Manikarnika Returns : झाशीच्या राणीनंतर काश्मीरची वॉरिअर क्वीन बनणार कंगना रणौत राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याचे उदाहरण दंतकथा बनले. ब्रिटीश सैन्यातील अधिकाऱ्यांच्या आठवणींमध्ये त्यांच्या शौर्याचा आदरपूर्वक उल्लेख आढळतो. लॉर्ड कॅनिंग आणि ब्रिटीशांच्या खात्यांवरून राणीच्या पराक्रमाची आणि तिच्या शेवटच्या युद्धाची माहिती मिळते. स्थानिक बोलींच्या गाण्यांमध्ये आणि कथांमध्ये राणीला विशेष स्थान देण्यात आले आहे. सुभद्रा कुमारी चौहान यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या कवितेचे खूप कौतुक होत आहे.
  Published by:Rahul Punde
  First published: