मुंबई, 10 एप्रिल : चैत्र नवरात्रौत्सवाला 2 एप्रिलपासून सुरुवात झाली होती आणि 10 एप्रिल रोजी नवरात्रौत्सव समाप्ती आहे. याच दिवशी राम नवमी (Ram Navami) साजरी करण्यात येते. भारतात राम नवमीला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले प्रभू रामांचा जन्म झाला होता. यामुळेच हा दिवस श्री राम नवमी म्हणून साजरी करण्यात येते.
भारतात श्री राम नवमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येते. राम जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. राम नवमी निमित्त शुभेच्छा देणारे काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला
राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून, कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती तुझी।
राम राखे अंतरी।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा
पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक बाणी, एक वचनी,
मर्यादा पुरुषोत्तम
असे आहेत आमचे प्रभू श्री राम,
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
गंगे सारखी गोदावरी तीर्थ
झाले प्रयाग सर्वात मोठी अयोध्या नगरी
जिथे जन्मले प्रभू श्रीराम.
दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती तुझी।
राम राखे अंतरी।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप
खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद,
सौभाग्याने भरलेले राहू द्या.
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!
संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Festival, Ram Navami 2023