रक्षाबंधनाला बहिणीला देऊ शकता 'डिजीटल' गिफ्ट; हे आहेत 7 पर्याय

रक्षाबंधनाला बहिणीला देऊ शकता 'डिजीटल' गिफ्ट; हे आहेत 7 पर्याय

आज जमाना 'डिजीटल' होतोय तेव्हा आपल्या बहिणीला नवीन गॅजेट्स भेट द्या ज्याने तिची मदत होईल. अशाच काही डिजीटल भेटी आम्ही तुम्हाला सूचवतो.

  • Share this:

4 ऑगस्ट : रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीचा सण. या सणाला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी द्यायला उत्सुक असतो. पण यावर्षी तुमच्या बहिणीला तुम्ही द्या अशी भेट जी तिच्या कामी ही येईल आणि ज्याने तिला तुमची आठवणही येत राहील. आज जमाना 'डिजीटल' होतोय तेव्हा आपल्या बहिणीला नवीन गॅजेट्स भेट द्या ज्याने तिची मदत होईल. अशाच काही डिजीटल भेटी आम्ही तुम्हाला सूचवतो.

1.स्मार्टफोन

 

आपल्या बहिणीला स्मार्टफोनहून चांगली डिजीटल भेट काय असेल? तो तिला रुचेलही आणि भरपूर कामीही येईल. आणि जर तिच्याकडे जुना एखादा स्मार्टफोन असल्यास नवा स्मार्टफोन घेण्यासाठी ती किती उत्सुक असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे स्मार्टफोनचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.

2. इयरफोन

तुमच्या बहिणीला गाणं ऐकायला आवडतं का? ती रोज मोठ्या आवाजात गाणं ऐकत असल्यामुळे तुमची झोप मोड होते का? मग तर तुम्ही तिला नक्कीच इयरफोन भेट द्यायला हवे.

ती खूशही होईल आणि तुमची झोपही मोडणार नाही.

3.स्मार्ट वॉच

तुमच्या बहिणीला एखादा दागिना भेट म्हणून द्यायच्याऐवजी मनगटावर सजणारं आणि अचूक वेळ सांगणारं स्मार्ट वॉच भेट द्या. यामध्ये फोनचे अनेक फिचर्सही आहेत आणि हे घड्याळ तिला कायम योग्य वेळही सांगेल.

4 डी.एस.एल आर

जर तुमच्या बहिणीला फोटो काढण्याचा छंद असेल तर डी.एस.एल.आरहून उत्तम भेट काहीच नाही. याने तिला तिचा छंदही जोपासता येईल.

5.ई.रीडर

असं म्हणतात 'वाचाल तर वाचाल'. तुमच्या बहिणीला वाचनाची आवड आहे का? आज अनेक पुस्तकं ही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ती वाचायला तिला ई रीडर भेट म्हणून द्या. यामुळे तिला तिच्या आवडीची कितीतरी पुस्तकं एका क्लिकवर वाचता येतील

6.फिटनेस बॅन्ड

तुमची बहीण फिटनेस फ्रिक आहे का? जर ती फिटनेस फ्रिक असेल तर तिला फिटनेस बॅन्ड गिफ्ट करा. यामुळे तुम्हाला तिची किती काळजी आहे हे तिला जाणवेल आणि ती खूशही होईल

7.ब्लू टूथ स्पीकर

तुमच्या बहिणीला जर पार्टी करायला आवडत असेल तर तुम्ही तिला ब्लू टूथ स्पीकरच द्यायला हवं. याने तिला पार्टी एन्जॉयही करता येईल आणि मित्रांवर इम्प्रेशनही पडेल.

First published: August 4, 2017, 10:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading