मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाला खास दिसण्यासाठी घरीच बनवा हे फेसपॅक, चेहऱ्यावर येईल अप्रतिम ग्लो

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाला खास दिसण्यासाठी घरीच बनवा हे फेसपॅक, चेहऱ्यावर येईल अप्रतिम ग्लो

रक्षाबंधनाला सर्वकाही परिपूर्ण बनवण्याच्या आणि इत्तर गोष्टी व्यवस्थित करण्याच्या नादात बहिणींना स्वतःचे लाड करायला वेळ मिळत नाही. रक्षाबंधनाला ड्रेस आणि मेकअप पूर्ण करण्यासाठी चेहरा चमकदार असणे आवश्यक आहे.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 8 ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या आगमनापूर्वीच बहिणी हा सण खास बनवू लागतात. राखी खरेदी असो किंवा पाहुण्यांच्या स्वागताची तयारी असो. प्रत्येक काम त्यांना चोखपणे करायचे असते. सर्वकाही परिपूर्ण बनवण्याच्या प्रयत्नात त्यांना स्वतःचे लाड करायला वेळ मिळत नाही. रक्षाबंधनाला ड्रेस आणि मेकअपसह लौक कम्प्लिट करण्यासाठी चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग असणे आवश्यक आहे. सणासुदीत पार्लरला जायला वेळ नसतो तेव्हा घरगुती फेस पॅकमधूनच झटपट ग्लो मिळतो. यासाठी जास्त वेळ किंवा साहित्य लागत नाही. चला अशाच काही पॅकबद्दल जाणून घेऊया जे चेहऱ्याला झटपट चमक देऊ शकतात. मध आणि बेसन फेसपॅक रक्षाबंधनाला ग्लोइंग दिसण्यासाठी बेसन आणि मधाचा पॅक वापरून पाहता येईल. बेसनचा नेहमीच त्वचेच्या निगा राखण्यात समावेश केला जातो. हा पॅक चेहऱ्याचा थकवा दूर करण्यातही मदत करू शकतो. हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि थोडा मध घ्या. चमच्याच्या मदतीने या सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा. पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून मॉइश्चरायझ करा. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावता येतो.

Hair Care : तुमचे केस गळण्याचे कारण तेल तर नाही ना? आजच बदला तुमची ही सवय

कोरफडीचा फेसपॅक कोरफड चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन करण्यास मदत करते. कोरफडीचा फेस पॅक धूळ आणि प्रदूषणामुळे खराब झालेली त्वचा पुन्हा चमकवू शकतो. हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा कोरफडीचा गर, थोडी हळद, गुलाबपाणी आणि एक चमचा मध घ्या. या सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा. त्वचेला मसाज करताना ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांनी धुवून टाका. या पॅकच्या वापराने चेहऱ्यावर झटपट चमक येईल. एकटेपणा जाणवतोय? ही डिप्रेशनची सुरुवात तर नाही ना? या टिप्सच्या मदतीने करा एकटेपणावर मात कॉफी आणि कोरफड फेसपॅक कॉफी आणि कोरफड त्वचेच्या मृत पेशी आणि ब्लॅक हेड्स काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॉफी त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. हा पॅक बनवणे खूप सोपे आहे. एका भांड्यात एक टीस्पून कोरफडीचा गर, एक टीस्पून कॉफी पावडर, गुलाबपाणी आणि थोडे दही घ्या. नीट मिक्स करून पेस्ट बनवा. या पेस्टने त्वचेला 2 ते 3 मिनिटे स्क्रब करा आणि नंतर कोरडे होऊ द्या. काही वेळाने मसाज करून धुवा. याने तुमची त्वचा स्वच्छ आणि नितळ दिसेल.
First published:

Tags: Beauty tips, Home remedies, Lifestyle

पुढील बातम्या