रक्षाबंधन: बहिणीचं टिळा लावणं असतं आरोग्यदायी, वाचा हे 7 फायदे

रक्षाबंधन: बहिणीचं टिळा लावणं असतं आरोग्यदायी, वाचा हे 7 फायदे

या सणाला बहिण भावाला ओवाळत त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट- उद्या अर्थात 15 ऑगस्टला महाराष्ट्रात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सणाला बहिण भावाला ओवाळत त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते. पण हा टिळा लावण्यामागे नेमकी काय कारण असतं हे तुम्हाला माहीत आहे का?

सर्वसामान्यपणे चंदन, हळद, कुंकू, भस्म यांचा टिळा लावला जातो. पण ज्यांना असा कोणताही टिळा लावायचा नसतो त्यांना पाण्याचा टिळा लावायला सांगितलं जातं. यासोबतच टिळा लावण्याचे 7 फायदे कोणते तेही जाणून घेऊ-

1 कपाळाला टिळा लावल्याने व्यक्तिमत्त्व प्रभावी होतं. याचा मानसशास्त्रानुसार परिणाम होतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो.

2 नियमितपणे कपाळावर टिळा लावल्यास डोक्याचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. इतकंच नव्हे तर मन शांत राहते. यामुळे मानसिक आजारांपासून बचाव होतो.

3 मेंदूत सेराटोनिन आणि बीटा एंडोर्फिनचा प्रवाह संतुलित होतो. यामुळे शरीरातली उदासिनता जाऊन उत्साह येतो.

4 डोकेदुखीची समस्याही दूर होते.

5 हळद आणि कुंकू मिश्रीत टिळा लावल्याने त्वचा शुद्ध होते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिअल तत्त्व असतात, जे अनेक रोगांपासून शरीराचं रक्षण करतात.

6 धार्मिक मान्यतेनुसार, चंदनाचा टिळा लावल्याने मनुष्याची सर्व पाप धुवून निघतात. तसंच अनेक संकटांपासून संरक्षण होतं. ज्योतिष शास्त्रानुसार, चंदनाचा टिळा लावल्याने ग्रहांची शांती होते.

7 असंही मानलं जातं की चंदनाचा टिळा लावल्याने घरात नेहमीच अन्न आणि धन यांची भरभराट राहते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा आलाय कंटाळा, तर आलाय नवीन ‘स्टँडिंग डेस्क’

...म्हणून दिवसरात्र नवरा- बायको भांडतात, रिसर्चमध्ये समोर आलं कारण

मनी प्लान्ट नाही तर हे रोप घरी लावा आणि व्हा श्रीमंत

VIDEO: ...जेव्हा महिलेने किचनमध्ये पाहिला 5 फूट लांबीचा कोब्रा!

First published: August 14, 2019, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading