• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Raksha bandhan चं कोरोना वॉरिअर बहिणींना किती गोड गिफ्ट आहे पाहाच; 'चितळे बंधू'चा VIDEO होतोय तुफान VIRAL

Raksha bandhan चं कोरोना वॉरिअर बहिणींना किती गोड गिफ्ट आहे पाहाच; 'चितळे बंधू'चा VIDEO होतोय तुफान VIRAL

रक्षाबंधनदिनी कोरोना योद्धा 'सिस्टर्स'ना सलाम (फोटो सौजन्य - चितळे बंधू मिठाईवाले यूट्युब व्हिडीओ ग्रॅब)

रक्षाबंधनदिनी कोरोना योद्धा 'सिस्टर्स'ना सलाम (फोटो सौजन्य - चितळे बंधू मिठाईवाले यूट्युब व्हिडीओ ग्रॅब)

raksha bandhan 2021 : रक्षाबंधनाचा हा सुंदर व्हिडीओ पाहून तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही.

 • Share this:
  पुणे, 19 ऑगस्ट :  रक्षाबंधन (Raksha bandhan 2021) म्हणजे भाऊ (Brother) आपल्या बहिणीचं (Sister) आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन तिला देतो. पण या कोरोना काळात खरंतर लाखो बहिणींनी आपल्या भावांचं किंबहुना त्यांच्या कुटुंबाचं रक्षण केलं आहे आणि या बहिणी म्हणजे नर्स (Nurse) ज्यांना आपण सिस्टर्सच म्हणतो. कोरोना काळात रक्षाबंधनदिनी या सिस्टर्सना विसरून कसं बरं चालेल.  प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाल्यांनी (Chitale bandhu mithaiwale) तर या सिस्टर्सना गोड अशी रक्षाबंधन भेट दिली आहे (Raksha bandhan gift). रक्षाबंधन आली की बऱ्याच जाहिराती येतात. बहीण-भावाच्या नात्यातील सुंदर क्षण या जाहिरातीतून खुलवलं जातं. अशाच जाहिरातींपैकी एक चितळे बंधू मिठावाल्यांची ही जाहिरात आहे. जी त्यांनी कोरोना योद्धा नर्सना समर्पित केली आहे. रक्षाबंधनची इतकी सुंदर जाहिरात तुम्ही कधीच पाहिली नसेल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला कोणता तरी घरगुती कार्यक्रम हे दिसून येतं. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मोजकीच लोकं जमली आहे. पण अजूनही एका माणसाची प्रतीक्षा आहे. त्या एका माणसासाठी संपूर्ण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. अखेर जिची प्रतीक्षा असते ती व्यक्ती येतेच. आता ही व्यक्ती इतकी स्पेशल का आहे? याची कुजबूजही सुरू होते. ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर कोरोना योद्धा नर्स आहे. हे वाचा - राज्यात दुसरी लाट नियंत्रणात पण धोका कायम! 3 जिल्हे देतायेत मोठ्या संकटाचे संकेत हा नामकरणाचा कार्यक्रम आहे आणि ज्या बाळाचं नामकरण होणार आहे, त्या बाळाच्या आईला प्रेग्नन्सीत कोरोना झाला होता. अशा परिस्थितीत या नर्सने आईची आणि बाळाची पुरेपूर काळजी घेतली. ही सिस्टर जिने खरंच बहिणीसारखी आपल्या भावाच्या कुटुंबाची म्हणजे त्याचा बायकोची आणि त्याच्या बाळाची सेवा केली. त्यामुळे साहजिकच तिच्याशिवाय हा नामकरण सोहळा पार पडणं शक्यच नाही. हे वाचा - पंतप्रधान मोदी हल्ली दिवसभरात एकदाच जेवतात; स्वतःच सांगितलं कारण चितळे बंधूंची ही रक्षाबंधनाची सुंदर जाहिरात पाहून डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत चितळे बंधू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बंधूंनी आपल्या चितळे बंधूसह भगिनी जोडत चितळे बंधू भगिनी मिठाईवाले असं आपल्या ब्रँडचं रक्षाबंधन दिवसापुरता नामकरत करत. अशा लाखो भगिनींचा सन्मान केला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: