Home /News /lifestyle /

खरंच की काय? रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्लाच्या बाळाची आई होणार राखी सावंत?

खरंच की काय? रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्लाच्या बाळाची आई होणार राखी सावंत?

बिग बॉस 14 च्या (Big boss 14) घरात राखी सावंतनं (Rakhi sawant) अभिनव शुक्लाबाबत (Abhinav shukla) आणखी एक मोठा खुलासा केला आहे.

मुंबई, 19 जानेवारी : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi sawant) बिग बॉस 14 च्या (Big boss- 14) घरात गेल्यापासून प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन (entertainment) करत आहे. राखी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. सध्या राखी सावंत अभिनव शुक्लावर (Abhinav shukla) असलेल्या प्रेमामुळे (Love) चर्चेत आहे. राखी सावंतने बिग बॉसच्या घरातील सर्व मेंबर्ससमोर रुबीना दिलैकचा (Rubina dilaik) पती अभिनव शुक्ला आपल्याला आवडत असल्याचं सांगितलं आणि आता तर तिला त्याच्या बाळाची आईदेखील व्हायचं आहे. राखी सावंतने बिग बॉसच्या घरातील सदस्य असणाऱ्या सोनाली फोगाटशी (Sonali Phogat) चर्चा करतानाआपण आपले स्रीबीज फ्रिझ करून ठेवलं असून डोनरच्या शोधात असल्याचं म्हटलं आहे. यासाठी तिला डोनर म्हणून अभिनव शुक्ला हवा आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनव, रुबिना आणि त्याच्या कुटुंबियांना याबाबत विचारणार असल्याचंदेखील म्हटलं. अभिनवमध्ये आपण आपला पती रितेशला (Ritesh) पाहत असल्याचं तिनं सोनालीला सांगितलं. अभिनव आणि रुबिनाच्या नात्यात तिला फूट नाही पण अभिनवने तिला कॉफी डेट, सिनेमा पाहायला आणि बाहेर फिरायला न्यावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली. हे वाचा - Big News! ईदच्या दिवशी थिएटरमध्येच रिलीज होणार 'राधे'; भाईजान म्हणाला, पण... बाथरूम एरियामध्ये या दोघींच्या संभाषणादरम्यान राखीच्या भावनांचा बांध फुटला. यावेळी आपल्या पतीविषयी बोलताना ती भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. राखीने यावेळी बोलताना आपला पती आपल्याला सर्वांसमोर स्वीकारण्यास तयार नसल्याचं म्हणाली. काही वैयक्तिक कारणांमुळे तो आपल्याला सर्वांसमोर स्वीकारू शकत नसल्याचंदेखील राखीनं सांगितलं. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या वैवाहिक आयुष्याविषयी देखील चर्चा केली होती. तिच्या पतीला घटस्फोट हवा असल्याचे देखील तिनं कार्यक्रमात म्हटलं होतं. आपल्या पतीने बिगबॉसमध्ये येऊन सर्वांच्या समोर आपला स्वीकार करावा अशी इच्छा देखील तिनं काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. हे वाचा - जे विरुष्कानं केलं तेच सैफिनाही करणार; आपल्या बाळाबाबत घेतला मोठा निर्णय स्पर्धकांच्या घरातील सदस्य भेटायला आल्यानंतर राखी सावंतचा पती येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजूनपर्यंत त्याचा घरात प्रवेश झालेला नाही. 2019 मध्ये राखी सावंतने रितेशबरोबर लग्न केल्याची घोषणा केली होती. पण अजूनपर्यंत तो समोर आला नसून चाहत्यांना देखील त्याला पाहण्याची उत्सुकता आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Bigg boss, Rakhi sawant

पुढील बातम्या