चैन सिंह तंवर/अजमेर, 26 जानेवारी : बऱ्याच फिल्ममध्ये तुम्ही पुनर्जन्म झाल्याचा पाहिलं असेल. पण प्रत्यक्षात खरंच असं होत असेल का? याबाबत प्रश्न कायम आहेच. काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही नाही. अशात आता पुनर्जन्माशीसंबंधित एका प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. राजस्थानमधील
(Rajasthan) एका 4 वर्षांच्या मुलीने आपला पुनर्जन्म झाल्याचा दावा केला आहे
(4 Year old girl kinjal reincarnation real story).
राजसमंद (Rajsamand) जिल्ह्यातील परावल गाव. या गावातील रतनसिंह चुंडावतला 5 मुली आहेत. त्यांची सर्वात लहान मुलगी किंजल जी 4 वर्षांची आहे. गेल्या वर्षभरापासून ती आपल्या लहान भावाला भेटण्याचा हट्ट करत आहे.
किंजलचे आजोबा राम सिंह चुंडावत यांनी सांगितलं की सुरुवातील त्यांनी तिच्या या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पण दोन महिन्यांपूर्वी तिची आई दुर्गाने तिला तिच्या वडिलांना बोलवायला सांगितलं तेव्हा तिने आपले वडील पिपलांत्री गावात असल्याचं सांगितलं.
हे गाव किंजल आता ज्या गावात राहते, त्यापासून 30 किलोमीटर दूर आहे. या गावात उषा नावाची एक महिला होती जिचा जळून मृत्यू झाला होता. किंजल सांगते की तिच उषा आहे.
तिने तिच्या आधीच्या आयुष्याबाबत, तिचा मृत्यू कधी आणि कसा झाला हे सर्व सांगितलं. किंजलने सांगितलं तिचे आई-वडील, भाऊ असं संपूर्ण कुटुंब पिपलांत्रीमध्ये राहतं. ती 9 वर्षांपूर्वी तिथं जळाली होती. त्या दुर्घटनेचा तिचा मृत्यू झाला. अॅम्ब्युलन्स तिला इथं सोडून गेली. तिच्या कुटुंबात दोन भाऊ-बहीण आहेत. माहेर पिपलांत्री आणि सासर ओडनमध्ये आहे.
हे वाचा - चमत्कारच! काही सेकंदात फुटणारा बबल तब्बल 465 दिवस टिकला; यात इतकं काय होतं खास
किंजलच्या कुटुंबाला वाटलं की तिला कोणता तरी आजार असावा म्हणून त्यांनी डॉक्टरांनाही दाखवलं. पण वैद्यकीय तपासणीत तर ती पूर्णपणे निरोगी होती. डॉक्टरांच्या मते, काही मुलांना त्यांच्या मागील जन्मातील गोष्टी लक्षात राहतात.
मुलीने सांगितलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करता तिचं कुटुंब, नातेवाईक, ग्रामस्थ शॉक झाले. मुलीने आपल्या मागील जन्माबाबत जे सांगितलं ते सर्व खरं निघालं. उषाच्या पिंपलांत्री गावातील लोकांनी दावा केला की 9 वर्षांपूर्वी आगीत जळून तिचा मृत्यू झाला आहे.
किंजलची ही स्टोरी पिपलांत्रीतल्या पंकजपर्यंत पोहोचली. पंकज हा उषाचा भाऊ. पंकजला पाहताच किंजलच्या आनंदाला पारावर फरला नाही. फोनमध्ये जेव्हा तिला तिची आई आणि उषाचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा ती हुंदके देत रडू लागली. त्यानंतर 14 जानेवारीला किंजल आपल्या कुटुंबासोबत पिपलांत्री गेली.
उषाची आई गीता पालीवालने सांगितलं, तिची मुलगी उषा 2013 साली घरात काम करता गॅसमुळे जळाली होती. तिला दोन मुलं आहेत. किंजल आमच्या गावात आली तेव्हा ती कित्येक वर्षांपासून इथंच राहत होती, असं वाटलं. ज्या महिलांना ती ओळखत होती, त्यांच्याशी बोलली. जे फूल उषाला आवडत होतं, त्याच फुलाबाबत किंजलनेही विचारणा केली. तिच्या मुलांनाही तिने मायेने जवळ घेतलं, त्यांच्याशी बोलली.
हे वाचा - आश्चर्य! 9 महिने नव्हे तर 2000 वर्षे आईच्या पोटात होतं बाळ; बाहेर काढताच...
यानंतर आता किंजल आणि उषाच्या कुटुंबात एक नातं तयार झालं आहे. किंजल दररोज त्यांच्याशी फोनवर बोलते. उषाची आई सांगते, आम्हाला असं वाटतं जणू आम्ही उषाशीच बोलतो आहोत कारण ती लहानपणी अशीच बोलायची.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.