शंखनाद आणि चिखलामुळे वाढते इम्युनिटी; दावा करणारा भाजप खासदारच आता कोरोना संक्रमित

शंखनाद आणि चिखलामुळे वाढते इम्युनिटी; दावा करणारा भाजप खासदारच आता कोरोना संक्रमित

शंखनाद आणि चिखलात अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोनाव्हायरसला दूर ठेवता येऊ शकतं, असा दावा या खासदाराने केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली.अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात जवळपास 30 टक्के खासदारांचे रिझल्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यापैकी एक म्हणजे राजस्थानमधील भाजप खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया (sukhbir singh jaunapuria). त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सुखबीर सिंग जौनपुरिया हे टोंक सवाई माधोपूरचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात ते चिखलात बसलेले होते आणि त्यांच्या हातात शंख होता. शंख वाजवल्याने आणि चिखलात अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यास मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आता त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.

सुखबीर सिंह या व्हिडीओत म्हणाले, "कोणत्याही औषधाने रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही. तर नैसर्गिक घटकांनी ती वाढते. शंख वाजवा, चिखल, पावसात भिजा, उन्हात जा, शेतात काम करा यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. माझ्या मतदारसंघातही एकही कोरोनाग्रस्त नाही. याचं कारण हेच आहे. मीदेखली या उपायाचा अवलंब करतो"

हे वाचा - काय म्हणताय! व्हायरसपासून फक्त बचाव नाही तर इम्युनिटीदेखील वाढवू शकतो MASK

सुखबीर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.

Published by: Priya Lad
First published: September 15, 2020, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading