कोरोना काळात साध्या तापावर रामबाण उपचार; घरगुती उपायांनी पळवा ताप

कोरोना काळात साध्या तापावर रामबाण उपचार; घरगुती उपायांनी पळवा ताप

  • Last Updated: Oct 23, 2020 09:27 PM IST
  • Share this:

कोरोनाच्या या परिस्थितीत साधा सर्दी, खोकला, ताप आला तरी भीती वाटते. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित तुम्हाला साधा तापही आलेला असू शकतो आणि अशा परिस्थिती तुम्हाला डॉक्टरला जायला मिळत नसेल तर तुम्ही घरगुती उपायांनीहीदेखील साधा ताप बरा करू शकता.

ताप बरा करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातच अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. या पदार्थांचा कशापद्धतीने वापर कराल हे समजून घ्या.

मणुका

मणुक्यामध्ये अनेक अँटिबॅक्टेरिअल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसह फिनोलिक फायटोन्युट्रिएंटदेखील असतात. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, मनुका संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी औषध म्हणून काम करतं. औषध म्हणून वापरण्यासाठी 20-25 मनुका अर्धा कप पाण्यात भिजवा. त्या वाटून घ्या. या पाण्यात लिंबाचा रस घाला आणि ताप कमी होईपर्यंत दिवसातून दोनदा घ्या.

हळदीचं दूध

हळदीमध्ये ताप कमी करण्याचे गुणधर्म असतात. हळदीमध्ये कर्क्युमिन घटक असतो, ज्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल सारख्या सर्व गुणधर्मांचा समावेश आहे. कोमट दुधात हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी ते नियमितपणं घेतल्यास ताप बरा होतो.

चंदन

चंदन थंड आहे, त्यामुळे शरीर आणि मेंदू थंड राहतं. तापात डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी चंदन वापरा. अर्धा चमचा चंदन पावडरमध्ये थोडंसं पाणी घालून ही पेस्ट कपाळावर लावा. कपाळावर चंदन लावल्याने डोकेदुखी कमी होते.

पुदीना

पुदीनाची पानंदेखील थंड असतात. त्यामुळे शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होते. एक कप गरम पाण्यात एक चमचा भरडलेल्या पुदीन्याची पानं मिसळा आणि 10 मिनिटं उकळी येऊ द्या. मग गाळून त्यात थोडं मध घाला. दररोज 3-4 वेळा याचा वापर करा, याने ताप कमी होईल.

आलं

आल्यामध्ये नैसर्गिक संसर्गविरोधी आणि जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुण देखील असतात. हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, जे अनेक प्रकारच्या संक्रमणापासून शरीराचं संरक्षण करतं.

हे वाचा - तुमच्याकडे आहे कोरोनाविरोधात सर्वात मोठं शस्त्र; वापरलं नाहीत तर वाढेल धोका

एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा वाटलेलं आलं घाला. नंतर ते गाळून त्यात थोडं मध घालून हे मिश्रण चहाप्रमाणे दिवसातून तीन ते चार वेळा प्या. यानं ताप दूर होईल आणि तापामुळे होणारी डोकेदुखीदेखील बरी होईल.

तुळस

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, तापात प्रतिजैविक औषधं दिली जातात, ज्यामुळे ताप कमी होतो. तुळशीत समान प्रतिजैविक गुणधर्म आहेत जी ताप कमी करण्यास मदत करतात. तुळशीचा चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात काही तुळशीची पानं एक चमचा आलं घाला. हे निम्मं होईपर्यंत उकळवा. आता हे गाळून घ्या आणि थोडं मध घालून दोन ते तीन वेळा नियमित सेवन करा. यानं ताप बरा होईल.

हे वाचा - प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं पोट कसं कमी करायचं; तुमच्यासाठी सोपे घरगुती उपाय

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - आरोग्याच्या सामान्य समस्या

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 23, 2020, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading