मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रेल्वे कर्मचारी सर्जरी करून बनला मुलगी, बायकोला दिला घटस्फोट आता आवडत्या मुलासोबत करणार लग्न

रेल्वे कर्मचारी सर्जरी करून बनला मुलगी, बायकोला दिला घटस्फोट आता आवडत्या मुलासोबत करणार लग्न

नवी ओळख मिळवण्यासाठी रेल्वेतही त्याला बराच काळ संघर्ष करावा लागला. पण, आता येणाऱ्या नव वर्षात नवीन आयुष्याबद्दल ही सोनिया प्रचंड उत्साही आहे. या सोनियाला आता आपलं पूर्वीचं राजेश हे नाव आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक ओळख कायमची नामषेश करायची आहे.

नवी ओळख मिळवण्यासाठी रेल्वेतही त्याला बराच काळ संघर्ष करावा लागला. पण, आता येणाऱ्या नव वर्षात नवीन आयुष्याबद्दल ही सोनिया प्रचंड उत्साही आहे. या सोनियाला आता आपलं पूर्वीचं राजेश हे नाव आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक ओळख कायमची नामषेश करायची आहे.

नवी ओळख मिळवण्यासाठी रेल्वेतही त्याला बराच काळ संघर्ष करावा लागला. पण, आता येणाऱ्या नव वर्षात नवीन आयुष्याबद्दल ही सोनिया प्रचंड उत्साही आहे. या सोनियाला आता आपलं पूर्वीचं राजेश हे नाव आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक ओळख कायमची नामषेश करायची आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

गोरखपूर, 10 नोव्हेंबर : साधारण 9 वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न करून पत्नीला वाजत-गाजत घरी आणणारा रेल्वे अभियंता राजेश पांडे आता सोनिया (became girl ) बनून एका पुरूषासोबत सात फेरे घेण्याची तयारी करत आहे. थोडी विचित्र वाटत असली तरी ही सत्य घटना आहे. राजेशचा सोनिया होण्यासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी त्याच्यावर दीर्घ शस्त्रक्रिया झाली. लिंग बदलल्यानंतर (Railway employee change gender) नवी ओळख मिळवण्यासाठी रेल्वेतही त्याला बराच काळ संघर्ष करावा लागला. पण, आता येणाऱ्या नव वर्षात नवीन आयुष्याबद्दल ही सोनिया प्रचंड उत्साही आहे. या सोनियाला आता आपलं पूर्वीचं राजेश हे नाव आणि त्याच्याशी निगडीत प्रत्येक ओळख कायमची नामषेश करायची आहे.

सोनिया (पूर्वीचे राजेश पांडे) इज्जानगर मुख्य कारखाना व्यवस्थापक कार्यालयात तांत्रिक श्रेणी-1 पदावर तैनात आहे. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर राजेशला 19 मार्च 2003 रोजी रेल्वेत नोकरी करण्याची संधी मिळाली. त्याच्या कुटुंबात चार बहिणी आणि आई आहे. 2017 मध्ये राजेश लिंग बदलून एक महिला बनला आणि त्यानं आपलं नाव बदलून सोनिया ठेवलं. रेल्वेच्या इतिहासात पुरुष कर्मचाऱ्याची महिला होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वेला विभागाला लिंग बदलण्याची विनंती

इज्जतनगर येथील मुख्य कारखाना व्यवस्थापक कार्यालयात तांत्रिक श्रेणी-1 या पदावर कार्यरत असलेले राजेश पांडे (सध्या सोनिया) यांचे अनोखे प्रकरण समोर आल्यानं त्याची सर्वत्र चर्चा आहे. लिंग बदलल्यानंतर तिने रेल्वेच्या नोंदींमध्ये महिला म्हणून नोंद करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केलं होतं. असं पहिलंच आणि दुर्मिळ प्रकरण असल्यानं इज्जतनगर विभागाने उत्तर पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयाकडून याबाबत निर्देश मागवले. महाव्यवस्थापकांनी हे प्रकरण रेल्वे बोर्डाकडे पाठवले. अखेर रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार राजेशच्या मेडिकल कार्डवर लिंगाची नोंद महिला करण्यात आली.

लिंग डिसफोरियाअंतर्गत महिला म्हणून ओळख

वैद्यकीय मंडळाच्या अहवालाच्या आधारे, मुख्य कारखाना प्रशासनाने लिंग डिसफोरिया म्हणजेच एका लिंगातून दुस-या लिंगाची इच्छा असलेल्या महिलेची ओळख दिली आहे. जेंडर डिस्फोरियामध्ये हे सहसा दिसून येते की काही लोकांच्या शरीरात पुरुषाचे मन असते किंवा पुरुषांच्या शरीरात स्त्रीचे मन असते. हा हार्मोन बदलांचा परिणाम आहे.

हे वाचा - Working Women : नोकरदार महिलांनी या 6 गोष्टी कराव्यातच; फार बीझी शेड्युल असलं तरी रहाल फिट

मेक अप करायला आवडते

सोनियाने सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर त्यांना 2003 मध्ये अनुकंपा कोट्यातून बरेलीच्या वर्कशॉपमध्ये नोकरी मिळाली. त्याला नेहमी आपण महिला असल्यासारखे वाटायचे. तसेच सर्वसाधारण महिलांप्रमाणे त्याला मेकअप करायला आवडायचा.

राजेशचे लग्न दोन वर्षे टिकले

कुटुंबीयांनी 2012 मध्ये राजेशचे मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. मात्र, पती-पत्नी फारतर सहा महिने एकत्र राहिले असावेत, पण कधीच एकमेकांच्या जवळ आले नाहीत. सोनियाचे म्हणणे आहे की, हे नातं फक्त दोन वर्षे टिकलं आणि नंतर पत्नीने घटस्फोट घेतला.

हे वाचा - No Vaccine; No Entry, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

डिसेंबर 2017 मध्ये शस्त्रक्रिया झाली

सोनियांने सांगितले की, घटस्फोटानंतर तिने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून लिंग बदलले आणि तेव्हापासून स्त्री म्हणून ओळख मिळवण्यासाठी माझी धडपड सुरू झाली.

First published:

Tags: Indian railway, Women