Home /News /lifestyle /

Rahu Gochar 2022: या 3 राशींवर असेल राहुची कृपा! अचानक होईल धनलाभ, मिळेल घवघवीत यश

Rahu Gochar 2022: या 3 राशींवर असेल राहुची कृपा! अचानक होईल धनलाभ, मिळेल घवघवीत यश

प्रत्येक दीड वर्षानंतर राहु ग्रह राशी परिवर्तन (Rahu Rashiparivartan) करतो. यंदा 12 एप्रिल 2022 रोजी राहुने मेष राशीत (Rahu Changes Zodiac Sign) प्रवेश केला होता. हे राशी परिवर्तन काही लोकांसाठी खूप लाभदायक ठरू शकते.

  मुंबई, २९ जून : शनि नंतरचा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह अशी राहुची ओळख आहे. प्रत्येक दीड वर्षानंतर राहु ग्रह राशी परिवर्तन (Rahu Rashiparivartan) करत असतो. यंदा 12 एप्रिल 2022 रोजी राहुने मेष राशीत संक्रमण (Rahu Changes Zodiac Sign) करत प्रवेश केला होता. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहु याच राशीत राहील. राहु-केतू (Rahu-Ketu) या छाया ग्रहांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी उलट्या दिशेने फिरतात. राहुबाबत सामान्यत: लोकांच्या मनात भीतीची भावना असते. परंतु मेष राशीतील राहुचे (Rahu entered Aries) संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ परिणाम (Rahu Gochar Effect) देणारे असेल. मिथुन राशी (Gemini, Rahu Gochar 2022) मिथुन राशीच्या लोकांसाठी राहु संक्रमण खूप चांगले आहे. या लोकांना ऑक्टोबर 2023 पर्यंत मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच अनपेक्षित लाभही होऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायात घवघवीत यश मिळेल. विशेषत: हा काळ व्यापाऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरेल. गुंतवणुक करण्यासाठी चांगला काळ आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना या काळात प्रगती आणि मोठे पद मिळू शकते. 1 लाख 90 हजार अक्षरांनी तयार झाला आहे जगातील सर्वात मोठा शब्द, उच्चारायला लागतात साडे तीस तास कर्क रास (Cancer, Rahu Gochar 2022) राहूचे राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या लोकांना नोकरीत लाभ संभवतो, तसेच नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर 2023 पर्यंत चांगला काळ आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखाद्या तज्ञाशी सल्लामसलत केल्यानंतर आपण मोती धारण करू शकता. यामुळे शुभ परिणाम वाढतील.

  खूप गुणकारी आहे काळी मिरी-तुपाचे मिश्रण, सांधेदुखीपासून हृदयविकारापर्यंत अनेक समस्या करते दूर

  मीन (Pisces, Rahu Gochar 2022) राहूच्या या राशी परिवर्तनामुळे मीन राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. त्यांना अचानक कुठून तरी पैसे मिळतील. यासोबतच अडकलेले पैसेही मिळतील. एकूणच अनेक मार्गांनी मिळालेले पैसे तुमची आर्थिक स्थिती सुधारतील. याशिवाय नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकते. प्रगती होईल. अज्ञात शत्रुंपासून सुटका होईल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle

  पुढील बातम्या