अपचन, पित्तावर औषध आहे ही उग्र चवीची भाजी, असा करा वापर

अपचन, पित्तावर औषध आहे ही उग्र चवीची भाजी, असा करा वापर

ही भाजी आरोग्याकरिता अत्यंत गुणकारी आहे. पण उग्र म्हणून बऱ्याचदा तिचा विचार होत नाही.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : अनेक जण उग्र चवीचा किंवा उग्र वासाचा म्हणून खात नाहीत, पण मुळा हा अगदी गुणकारी पदार्थ आहे. महाराष्ट्रात भाजी- भाकरीबरोबर कच्चा मुळा खाण्याची पद्धत आहे.  शिवाय मुळ्याची कोशिंबीर, भाजीसुद्धा करतात. उत्तर भारतात मुळा खायचं प्रमाण आपल्यापेक्षा जास्त आहे. मुळ्याचे पराठे किंवा नुसत्या मुळ्याचं सॅलड तिथे रस्त्यावरही मिळतं. काही जण मात्र ताटात मुळा दिसल्यावर नाक मुरडतात. मात्र मुळा आरोग्याकरिता अत्यंत गुणकारी आहे. मुळ्याचे अनेक फायदे आहेत. मुळ्यात प्रोटीन, कॅल्शियम, आयोडिन आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. शिवाय सोडियम, फॉस्फोरस, क्लोरीन आणि मॅग्नेशियमही असतं. जाणून घ्या कोणकोणत्या आजारांवर त्याचा फायदा होतो. पण बऱ्याचदा मुळ्याची पानं फेकून दिली जातात. मुळ्याइतकाच किंवा त्यापेक्षा जास्त त्याचा पाला फायदेशीर आहे.

वाचाः मासे खा आणि कॅन्सरपासून दूर रहा, संशोधनात झालं सिद्ध!

किडनीच्या विकारांवर औषधी आहे मुळा

अनेक पौष्टिक तत्वांनी भरपूर असणारा मुळा किडनीसाठी फायदेशीर आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याच त्याची मदत होते. मुळ्याच्या पानांमध्ये फायबर असतं. हे खाल्ल्याने डायजेशन अधिक चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे पोटाचे विकार दूर होतात.

पोटासंबंधी आजारांना ठेवतं दूर

तुम्हाला कमी भूक लागते का? मग यावर मुळा आहे उपाय. मुळ्याच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळून तो प्यावा. त्याने तुमची भूक वाढण्यास मदत होईल.

वाचाः साखरेचा चहा प्यायचा सल्ला का देतायत सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर?

याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा उपयुक्त आहे. मुळ्याच्या रसाने पचनासंबंधीच्या समस्याही दूर होतील.

पित्ताशयाचं कार्य करतो सुरळीत

पोटामध्ये जडपणा वाटत असल्यास मुळाच्या रसात मीठ टाकून ते प्यावे. या रसाने पोटाला आराम मिळेल. पित्ताशयाशी निगडित समस्या असल्यास रोजच्या आहारात मुळ्याचा समावेश आवर्जून करा.

मधुमेहावर अत्यंत गुणकारी

मुळा खाल्ल्याने शरीरातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहून मधुमेहापासून बचाव होतो. दिवसेंदिवस मधूमेहाचं प्रमाण वाढत आहे. अशामध्ये मुळ्याच्या पानांची भाजी अतिशय फायदेशीर आहे. हृदयासंबंधित आजारांमध्ये किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. रक्तदाबाचा त्रास असल्यास सॅलड स्वरूपात नियमित मुळा खावा रक्तदाबाच नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

काविळीवर मुळा आहे रामबाण उपाय

कावीळ झाली असल्यास मुळा खावा. दररोज सकाळी एक कच्चा मुळा खाल्याने काविळ बरी होईल. यामुळे रक्त शुद्ध होते. रक्तामध्ये ऑक्सिजनचा पुरवठाही होतो.

SPECIAL REPORT: शाहबानो ते सायराबानो! काँग्रेसची चूक पण भाजपनं इतिहास घडवला

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 3, 2019, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading