मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात आधी बंद करा 'ही' सवय

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात आधी बंद करा 'ही' सवय

एका अभ्यासात अशी महिती समोर आली आहे की, दारु पिण्याची सवय सोडल्यास तुमचे मानसिक आरोग्य अधिक चांगले होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : आयुष्यात अनेक चढ-उतार होतच असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना नैराश्य, टेन्शन, कामाचा तणाव या समस्यांना सामोरं जावं लागतं. या समस्यांनाचा भार कमी करण्यासाठी अनेकजण अल्कोहोलचा आधार घेतात. क्वचित कधी अंमली पदार्थांचं सेवन, धूम्रपान अशा शरीराला हानिकारक गोष्टींचा अवलंब करायला सुरुवात केली जाते. काही काळाने त्याची सवय होऊन जाते आणि मग ते सोडणं अवघड होतं. खरंतर मानसिक ताणाला तात्पुरता विश्राम देण्यासाठी जरी याचं सेवन केलं जात असलं तरी ते आरोग्यासाठी हानीकारक आहे.

खरं तर एका अभ्यासात अशी महिती समोर आली आहे की, दारू पिण्याची सवय सोडल्यास तुमचे मानसिक आरोग्य अधिक चांगलं होऊ शकतं. ज्या महिला मध्यम प्रमाणात दारूचं सेवन करतात त्यांनी पिणं सोडल्यावर वेगळाच फरक दिसून आला. ही सवय सोडल्यानंतर त्यांच्या मानसिक आरोग्यामद्य सुधारल्याचं समोर आलं. CMAJ या जर्नलमध्ये परिणामांविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली. मानसिक आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये काही  महिलांच्या आरोग्याचं, सवयींचं निरीक्षण करण्यात आलं. त्यानुसार अभ्यासकांनी मानसिक आरोग्य आणि व्यसन यांचं व्यस्त प्रमाण असल्याचं नोंदवलं. असं निरीक्षण भारतातही व्हावं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. केवळ एका महिन्यासाठी दारुचं व्यसन सोडल्याने चयपचनाची प्रक्रिया सुधारते. त्याचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो, असं या जर्नलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

अर्धवट झोपेमुळे तरुणांना होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी म्हणजे जठरांत्रमार्गाच्या रोगांचा अभ्यास करणारे सल्लागार नवीव कुमार यांनी सांगितलं की, दारूची सवय सोडली तर त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि तो लगेच दिसून येतो. मेंदू आणि यकृत यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी व्यसन करणं बंद केले पाहिजे.

आता सोशल मीडियाच्या वापराने वाढू शकतो तरुणांचा कॉन्फिडन्स

Loading...

महिलांना या व्यसनांचा अधिक त्रास होतो, असंही अभ्यासातून समोर आलं आहे. रोगप्रतिकार शक्तीवर व्यसनाचा थेट परिणाम होतो. शिवाय हृदयविकाराची शक्यताही अधिक असते. अशा प्रकारच्या व्यसनांमुळे शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य स्थिर राहात नाही. मेंदूमध्ये सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं. सेरोटोनिनचं ते भूख, मूड, झोप, शिकण्याची प्रवृती आणि मेमरी यांना नियंत्रीत करतं. त्यावर व्यसनाचा परिणाम होतो त्यामुळे मानसिक आरोगमय बिघडते. अशी माहिती जयपी हॉस्पीटलचे सल्लागार मृणमय कुमार दास यांनी IANS ला दिली.

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 07:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...