मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Love Tips: Crush ला इम्प्रेस करायचंय? मग तुम्हाला असलेल्या 'या' वाईट सवयींना करा बाय-बाय

Love Tips: Crush ला इम्प्रेस करायचंय? मग तुम्हाला असलेल्या 'या' वाईट सवयींना करा बाय-बाय

काही वाईट सवयी तुमच्यापासून क्रशला दूर नेऊ शकतात.

काही वाईट सवयी तुमच्यापासून क्रशला दूर नेऊ शकतात.

काही वाईट सवयी तुमच्यापासून क्रशला दूर नेऊ शकतात.

    प्रेम करणं सोपं असतं; मात्र ते निभावणं अवघड असतं, असं म्हणतात. ही गोष्ट तुम्ही अनेकदा ऐकली असेल; पण ती केवळ सांगोवांगी गोष्ट नव्हे, तर प्रत्यक्षातही ते खरं आहे. कोणतंही नातं टिकवून ठेवायचं असेल, तर प्रेम ही मूलभूत गोष्ट आहेच पण त्यात मेहनतही लागते. तुमचंही कोणी क्रश (Crush) असेल, तर तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. खासकरून एखाद्या मुलीला इम्प्रेस (How to Impress Crush) करायचं असेल, तर ते काही जणांना कठीण जातं. काही वाईट सवयी (Bad Manners) तुमच्यापासून क्रशला दूर नेऊ शकतात. ड्रग्जचं व्यसन (Drugs) तरुण मुलांना अलीकडे धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज आदींची व्यसनं असल्याचं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. या सवयी आरोग्यासाठी तर चांगल्या नसतातच; पण बहुतांश मुलींना या सवयी आवडत नाहीत. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी आणि कोणा मुलीला तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल तरीही तुम्हाला व्यसनं सोडणं भाग आहे. गुंडागर्दी अनेक तरुण मुलांना अशी सवय असते, की थोडंसं काही तरी मनाविरुद्ध झालं, तरी एकदम चिडतात, भांडतात, थेट हाणामारीवरही पोहोचतात. 'अरे'ला लगेचच 'का-रे' करण्याची ही प्रवृत्ती त्यांच्या स्वतःसाठी आणि समाजासाठीही घातक असते. तसंच, असं काही तरी करून आपण मुलींचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असल्याचा समज असेल, तर तसं वास्तविक नाही. मुलींना समजूतदार, समंजस स्वभावाचे मुलगेच आवडतात, हे ध्यानात ठेवावं. त्यामुळे अशी सवय असली, तर ती सुधारणंचं फायद्याचं आहे. हे वाचा - Mission Inspiration: चार सामान्य नागरिक अंतराळ सफरीवर, पाहा PHOTOs शिवीगाळ शिव्या देणं हे अनेक तरुणांच्या अगदी तोंडातच बसलेलं असतं. वेबसीरिज किंवा अन्य काही कार्यक्रमांमध्ये दाखवलं जातं, की आजकाल मुलीही खूप वाईट शिव्याही अगदी सहजपणे देतात; प्रत्यक्षात आपण ज्या समाजात वावरतो, त्यात मात्र बहुतांश मुलींना शिव्या देणं आणि शिव्या देणाऱ्या व्यक्ती या दोन्हींचा तिटकारा असतो. त्यामुळे तुमची क्रश तुमच्याजवळ यायला हवी म्हणून तिला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही काही करत असाल, तर शिव्यांची सवय पहिली घालवली पाहिजे. खोटं बोलणं खोटं बोलण्याची सवय अनेकांना असते. कारणपरत्वे आणि दुसऱ्याचं काही नुकसान होणार नसेल अशा वेळी खोटं बोललं तर फारसं वाईट नाही. कारण वेळ मारून नेण्यासाठी असं खोटं अनेकांना बोलावं लागतं; पण आपली नोकरी, कुटुंब आपलं उत्पन्न, आपली पार्श्वभूमी, पूर्वायुष्यात घडलेल्या गोष्टी आदींबद्दल खोटं बोलणं मात्र अजिबात योग्य नाही. अशा बाबतींत खोटं बोलणाऱ्या व्यक्ती महिलांना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे खोटं बोलण्याची, फसवणूक करण्याची सवय असेल, तर ती सोडून द्यावी लागेल.
    First published:

    Tags: Love, Relationship tips

    पुढील बातम्या