PV Sindhuचा फिटनेस फंडा पाहून व्हाल अवाक्; म्हणाल, कोण करतं एवढं कठीण डाएट

PV Sindhuचा फिटनेस फंडा पाहून व्हाल अवाक्; म्हणाल, कोण करतं एवढं कठीण डाएट

एका खेळाडूसाठी स्वतःला फिट ठेवणं हे फार महत्त्वपूर्ण असतं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी एकाग्रतेने दररोजच्या जीवनाला एक शिस्त लावावी लागते.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट- वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला सूवर्ण पदक मिळवून देऊन इतिहास रचणाऱ्या बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने या एका दिवसासाठी तिने कित्येक महिने दिवस- रात्र मेहनत केली. एका खेळाडूसाठी स्वतःला फिट ठेवणं हे फार महत्त्वपूर्ण असतं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी एकाग्रतेने दररोजच्या जीवनाला एक शिस्त लावावी लागते. सिंधूने स्वतःच्या आयुष्यात कशाप्रकारे शिस्त लावली ते जाणून घेऊ.

पीव्ही सिंधुच्या फिटनेसचा राज- सिंधूने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती फार कठीण फिटनेस प्लॅन फॉलो करते. सिंधू सकाळी 4 वाजता उठते आणि दुपारी 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करते. यानंतर 1 वाजता दुपारचं जेवण करते.

सिंधुचं डाएट- खाण्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन योग्य प्रमाणात जाईल याकडे सिंधुचं विशेष लक्ष असतं. यासाठी ती नाश्त्यात दूध, अंडी आणि फळं खाते आणि दिवसभर प्रॅक्टिसदरम्यान, भरपूर पाणी पिते आणि आरोग्याला उपयुक्त असा आहार घेते.

दोन वेळच्या जेवणात ती भाज्या, भात आणि मटन खाते. वर्कआउटच्यावेळीही ती आपल्या खाण्या- पिण्याकडे विशेष लक्ष देते. ती स्वतःसोबत सतत फळं आणि ड्राय फ्रूट्स ठेवते, ज्यामुळे दिवसभर तिच्यात एनर्जी लागते. याशिवाय ती नियमितपणे मेडिटेशन आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करते.

सिंधुच्या वर्कआउटची खासियत- ती रनिंगशिवाय वर्कआउट सुरू करत नाही. विशेष गोष्ट म्हणजे तिचं वर्कआउट सेशन दररोज बदलत असतं. सिंधुच्या सांगण्यानुसार, वर्कआउट कसं असणार याचं प्लॅनिंग महिन्याच्या सुरुवातीलाच ठरतं. यात पाठीपासून गुडघे आणि खांद्यापर्यंतचे व्यायाम असतात.

पाच गोष्टी कधीही विसरू नका

आपल्या पार्टनरशी नेहमी हे खोटं बोलतात मुलं, पण कधीही मान्य करत नाहीत

अती बोलणं असतं धोकादायक, आपल्या बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडायची कशी?

VIDEO: ...आणि त्याने राहुल गांधींच्या गालावर KISS केलं

First published: August 28, 2019, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading