फक्त आरामासाठी नाही तर, यासाठीही गाडीत हवा असतो हेडरेस्ट

फार कमी लोकांना हे माहीत असतं की गाडीतील हेडरेस्ट फार महत्त्वाचा असतो. या हेड रेस्टला अनेकजण आरामासाठी आहे असं समजून गाडीतून काढून टाकतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 02:46 PM IST

फक्त आरामासाठी नाही तर, यासाठीही गाडीत हवा असतो हेडरेस्ट

गाडीतून प्रवास करणाऱ्यांपैकी अनेकांना त्यांच्या गाडीतील एक्सेसरीजबद्दल फारसं माहीत नसतं. अनेकजण तर या एक्सेसरीज नीट वापर करत नाहीत किंवा कधीच वापरत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला गाडीतील सीटवर लावण्यात आलेल्या हेडरेस्टच्या योग्य वापराबद्दल सांगणार आहोत.

फार कमी लोकांना हे माहीत असतं की गाडीतील हेड रेस्ट फार महत्त्वाचा असतो. या हेड रेस्टला अनेकजण आरामासाठी आहे असं समजून गाडीतून काढून टाकतात. सर्व गाड्यांमधले हेड रेस्ट हे शक्यतो काढून बाजूला ठेवू शकू असेच असतात. यावर एक कडक फोम लावलेला असतो तर खाली दोन स्टिलचे रॉड असतात, जे सीटला लावण्यात आलेलं असतं.

हेड रेस्ट हा अपघाताच्यावेळी प्रवाशांच्या मानेला इजा होऊ नये यासाठी तो गाडीत बसवण्यात आलेला असतो. गाडी जेव्हाही कोणत्या गोष्टीवर जाऊन आदळते, तेव्हा जास्त इजा होण्याचा धोका हा मानेला असतो. अशावेळी हेड रेस्ट मानेला आधार देतं.

सीटवर हेड रेस्ट नसेल तर डोक्याला आधार मिळत नाही आणि जोराच्या धक्क्यामुळए मानेचं हाड मोडण्याची किंवा जखम होण्याची भीती असते.

अनेक गाड्यांमध्ये सेंट्रल लॉक असतं. अपघात, इलेक्ट्रिकल फेल्युअर किंवा आग लागण्याच्या स्थितीत सेंट्रल लॉकमुळे दरवाज्या- खिडक्या बंद होऊन जातात. अशा परिस्थितीत हेड रेस्ट काढून त्याच्या दोन रॉडने खिडकीच्या काचा फोडता येऊ शकतात. गाडीच्या काचा आतून तोडल्यास त्या सहज तुटू शकतात.

Loading...

याशिवाय संकटाच्यावेळी तुम्ही हेडरेस्टच्या रॉडने स्वतःचा बचाव करू शकता. एकट्याने प्रवास करणाऱ्या मुला- मुलींसाठी हे जास्त फायदेशीर आहे. हेडरेस्ट लावताना ते डोक्यापासून फार उंचावर किंवा फार खाली असू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 31, 2019 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...