अस्सल पंजाबची मजा लूटायची असेल तर या शहराला नक्की भेट द्या!

पंजाब हे एक असं राज्य आहे जिथे तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमी आहे. परदेशातूनही अनेक पर्यटक पंजाब पाहण्यासाठी आवर्जुन येतात.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 05:08 PM IST

अस्सल पंजाबची मजा लूटायची असेल तर या शहराला नक्की भेट द्या!

पंजाब हे एक असं राज्य आहे जिथे तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमी आहे. परदेशातूनही अनेक पर्यटक पंजाब पाहण्यासाठी आवर्जुन येतात. तुम्हालाही पंजाब राज्य पाहायचं असेल आणि नक्की काय पाहायचं याच्या संभ्रमात असाल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही.

आज आम्ही तुम्हाला पंजाब राज्यातील बठिंडा शहराबद्दल सांगणार आहोत. पंजाब राज्याचं सांस्कृतिक शहर अशी याची ओळख आहे.

किला मुबारक- बठिंडामधलं सर्वात प्रसिद्ध स्थळ कोणतं असेल तर किला मुबारक हे आहे. येथूनच भारताच पहिली महिला शासक रजिया सुल्तानला हरवण्यात आलं होतं आणि बंदी म्हणून इथेच ठेवलं होतं. भारताच्या इतिहासात या स्थानाचं वेगळं महत्त्व आहे. किला मुबारक पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. हा किल्ला या शहराचा लँडमार्कही आहे.

बठिंडा झील- या शहरात तुम्हाला इतिहास आणि संस्कृतिचा योग्य मेळ दिसेल. जर तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर बठिंडा झील ही सर्वोत्तम जागा आहे. या तलावावर तुम्हाला नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसेल. धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी काही खास अविस्मरणीय क्षण काढायचे असतील तर या स्थळाला नक्की भेट द्या. पर्यटकांची आवड लक्षात घेऊन इथे खास नौका विहारची सोय करण्यात आली आहे.

बीर तलाब चिडियाघर- 1978 मध्ये रेड क्रॉस सोसायटीद्वारे स्थापीत करण्यात आलेलं हे बीर तलाब चिडियाघर 161 एकर जमिनीवर पसरलेलं आहे. कुटूंबासोबत निवांतक्षण घालवायचे असतील तर या जागेला नक्कीच भेट द्या. इथे प्राणी आणि पक्षांच्या विविधं प्रजाती तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या हे प्राणीसंग्रहालय पंजाब फॉरेस्ट अँड वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन विभागाच्या अंतर्गत आहे.

Loading...

पीर हाजी रतन मजार- पौराणिक कथांनुसार बाबा हाजी रतन यांनी राजा भोजचा राजदूत म्हणून मक्का दौरा केला होता. जेव्हा ते भारतात परतले तेव्हा बठिंडामध्ये काही काळ थांबले आणि ध्यानसाधनेला बसले होते. पीर हाजी रतन यांची मजार बठिंडामधील धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...