मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रेड हँड पकडलं; पोलीस नवऱ्याने केला बायकोचा 'पंचनामा'

बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रेड हँड पकडलं; पोलीस नवऱ्याने केला बायकोचा 'पंचनामा'

पोलीस असलेल्या नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय होताच. त्याने तिला रेड हँड पकडलं.

पोलीस असलेल्या नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय होताच. त्याने तिला रेड हँड पकडलं.

पोलीस असलेल्या नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय होताच. त्याने तिला रेड हँड पकडलं.

अमृतसर, 06 एप्रिल :  सध्या बहुतेकांचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) असतात आणि जोडीदारासमोर याचा पर्दाफाश होताच काय होऊ शकतं, याची कल्पनाही करू शकत नाही. पंजाबच्या अमृतसरमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली आहे. पोलीस असलेल्या नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय होताच पण त्याने तिला रंगेहाथसुद्धा पकडलं. त्यानंतर हॉटेलमध्येच त्याने धक्कादायक पाऊल उचललं. त्याची पत्नी आपल्या प्रियकराबरोबर हॉटेलच्या रूममधून बाहेर येताच तिला मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्येही कैद झाला.

ही व्यक्ती जालंधर (Jalandhar) येथील असून पोलीस कॉन्स्टेबल आहे. त्याची पत्नी गुरदासपूरची असून तिचा प्रियकर एसजीपीसीचा कर्मचारी आहे. माझ्या पत्नीचे परपुरुषासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरु होते, आणि ती मला धोका देत आहे, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. जेव्हा या व्यक्तीला समजलं की त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर एका हॉटेलमध्ये आहेत, तेव्हा तिला रंगेहाथ पकडण्यासाठी तो तिथं पोहोचला.

हे वाचा - लग्नाच्या दिवशीच लोचा झाला! होणारी बायको निघाली बहीण; पुढे काय झाला निर्णय पाहा

या महिलेचे आपल्या पतीसोबत फारसं पटत नव्हतं. त्यामुळे त्यांची घटस्फोटाची (Divorce) केस सुरू आहे. परंतु, ही महिला पतीकडून रक्कम घेऊनही त्यास घटस्फोट देण्यास तयार झाली नाही. त्यानंतर ही महिला एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. त्यानंतर तिचा पती आपल्या मित्रांना घेऊन त्या हॉटेलवर पोहोचला. आपली पत्नी समोर येताच त्याने तिला मारण्यास सुरुवात केली.

कॉन्स्टेबलने सांगितलं, सुमारे सहा वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले. पण लहान-सहान गोष्टींवरून माझी पत्नी माझ्याशी वाद घालत होती. तसंच भांडण करून ती सारखी माहेरी निघून जात असे. या वादाच्या अनुषंगाने दोन्ही कुटुंबं आणि पंचायतीने आम्हा दोघांना एक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही एक झालोसुद्धा आणि त्यानंतर जालंधरमध्ये राहत होतो. परंतु त्यानंतर माझी पत्नी सातत्याने मोबाईलवर व्यस्त असायची. त्यामुळे मला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. मी तिच्यावर बराच काळ नजर ठेवून होतो.

हे वाचा - खतरनाक! फ्लिप करत तरुणाने केला असा स्टंट; VIDEO पाहून तुम्हाला येईल चक्कर

आज तकच्या रिपोर्टनुसार रंजीत अव्हेन्यू पोलीस स्टेशनचे प्रभारी इन्स्पेक्टर रॉबिन हंस यांनी सांगितलं, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Punjab, Relationship, Wife and husband