मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चोरट्यांच्या हाती लागली चावी; कारसह गाडीमालकाची बायकोही पळवली

चोरट्यांच्या हाती लागली चावी; कारसह गाडीमालकाची बायकोही पळवली

कारमालकानं छोटीशी चूक केली आणि चोरट्यांनी तेव्हाच संधी साधली.

कारमालकानं छोटीशी चूक केली आणि चोरट्यांनी तेव्हाच संधी साधली.

कारमालकानं छोटीशी चूक केली आणि चोरट्यांनी तेव्हाच संधी साधली.

  • Published by:  Priya Lad

चंदीगड, 10 जानेवारी : एखादी कार (car) उभी आहे, कारमालक गाडीतच चावी ठेवून कुठेतही गेला. त्याची पार्टनर गाडीत त्याची वाट पाहते आहे. इतक्यात काही अनोळखी व्यक्ती येऊन कारसह कारमालकाच्या पार्टनरलाही पळवतात. एखाद्या चित्रपटाला साजेशी ही कथा प्रत्यक्षात घडली आहे. पंजाबमधील (punjab) एका व्यक्तीला कारमध्येच चावी आणि बायकोलाही सोडून गेला आणि त्याची हीच छोटीशी चूक चांगलीच महागात पडली. चोरट्यांनी ही संधी साधत फक्त कारच नाही तर कारमालकाच्या बायकोलाही पळवून नेलं. देरा बस्सीतील ही धक्कादायक घटना आहे.

धांद्रला गावातील राजीव चंडा आपली पत्नी रितूसह मुलांच्या शाळेत फी भरण्यासाठी गेले होते. सुखमनी स्कूलजवळ पोहोचताच त्यांनी कार एका ठिकाणी पार्क केली. ते कारमधून बाहेर पडले. पण कारची चावी गाडीतच ठेवली. कारमध्ये त्यांची पत्नीही होती. जसे राजीव शाळेत गेले तशा दोन व्यक्ती कारमध्ये घुसल्या. एक ड्रायव्हयरसच्या सीटवर बसला आणि दुसऱ्या कारम मालकाच्या बायकोच्या शेजारी त्यानं तिचं तोंड दाबून ठेवलं जेणेकरून ती ओरडणार नाही.

हे वाचा - धक्कादायक! आई रागावली म्हणून 17 वर्षीय मुलीनं थेट उचललं हे पाऊल

रिपोर्टनुसार चोर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेनं जवळपास 5 किलोमीटरपर्यंत ते कार घेऊन गेले. अंबाला टोल प्लाझाजवळ यू-टर्न घेतल्यानंतर त्यांनी तिथं रितूला कारबाहेर फेकलं. त्यानंतर ते डेरा बस्सीच्या दिशेनं गेले.

कारचा अद्याप पत्ता सापडलेला नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा तपास सुरू केला आहे. देरा बस्सीतील स्टेशन हाऊस ऑफिसर सतिंदर सिंग यांनी सांगितलं, अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल झाली आहे, आमची तपास सुरू केला आहे. टो प्लाझाजवळील सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत आहोत. लवकरात लवकर चोर आम्हाला सापडतील अशी आम्हाला आशा आहे.

First published:

Tags: Car, Crime news, Robbery