नवी दिल्ली, 30 डिसेंबर : ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) च्या कोरोना लशीला (CORONA VACCINE) ब्रिटनमध्ये (BRITAIN) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतातही या लशीला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण यूकेमध्ये (UK) या लशीला मंजुरी दिल्यानंतरच भारतात या लशीला मंजुरी मिळण्याबाबत विचार केला जाणार होता. त्यामुळे आता भारतातही लवकरच कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणार आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (pune serum institue of india) ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) आणि अॅस्ट्राझेनका (Astra Zeneca ) यांच्या मदतीनं तयार केलेली ही कोव्हिशिल्ड (COVISHEILD) कोरोना लस. ब्रिटनमध्ये या लशीला मंजुरी देण्यात आली आहे.
Oxford University/AstraZeneca’s Covid-19 vaccine approved by the United Kingdom regulator
"Govt has today accepted the recommendation from the Medicines and Healthcare products Regulatory Agency to authorise Oxford University/AstraZeneca’s Covid-19 vaccine for use," says UK Govt
ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनका च्या कोव्हिड 19 लशीला आपात्कालीन मंजुरी द्यावी यासाठी केलेल्या अर्ज मेडिसीन अँड हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेगुलेटरी एजन्सीनं (MHRA) मंजूर केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही या लशीला मंजुरी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत ट्वीट केलं आहे.
अॅस्ट्राझेनकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट यांनी सांगितलं, यूकेतील लोकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण त्यांना कोरोना लस मिळणार आहे. ही लस प्रभावी आहे. या लशीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.
Subject Expert Committee (SEC) of Drugs Controller of India to take a meeting to consider Serum Institute of India's application for emergency use approval of its COVID19 vaccine, says a government official
CNN News18 शी बोलताना पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांन सांगितलं, ही खूप मोठी आणि प्रोत्साहन देणारी अशी बातमी आहे. आता आम्हाला भारतात या लशीला अंतिम मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
भारतात आजच या लशीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसं झालं तर भारतात मंजुरी मिळणारी ही पहिली कोरोना लस ठरणार आहे.