पुणे, 11 जानेवारी : भारतात कोरोना लशीला (Corona vaccine) आपात्कालीन मंजुरी तर मिळाली पण या लशींची किंमत किती असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पुण्यातील (Pune) कोरोना लशीची किंमत जारी करण्यात आली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (pune serum institute of india) कोविशिल्डची (covishield) किंमत ठरवली आहे. फक्त एका टी-शर्टच्या किमतीत ही लस मोदी सरकारला उपलब्ध होणार आहे.
कोविशिल्ड ही लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (pune serum institute of india) ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार केली आहे. लशीला परवानगी मिळताच सीरम इन्स्टिट्यूटनं त्याची किंमतही जारी केली आहे. कोविशिल्डच्या प्रति डोसची किंमत 220 रुपये असेल. 14% टक्के जीएसटी लावून ही किंमत ठरवण्यात आली आहे. सरकार इतक्या किमतीत सीरमकडून कोरोना लस खरेदी करणार आहे.
The vaccine would be available at the price of Rs 200 per vial: Serum Institute of India (SII) officials#COVID19 https://t.co/9NdDRYXrGj
— ANI (@ANI) January 11, 2021
कोविशिल्ड (covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) या दोन कोरोना लशींचा (corona vaccine) मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. लसीकरणात कोविशिल्ड लस प्राधान्यानं दिली जाईल. तर कोवॅक्सिन ही बॅकअपला असेल. गरज पडल्यास किंवा नव्या स्ट्रेनविरोधात प्रभावी असल्याने नव्या स्ट्रेनचा उद्रेक झाल्यासच स्वदेशी कोरोना लस दिली जाईल, असं केंद्र सरकारनं याआधी स्पष्ट केलं आहे.
हे वाचा - चीननं मानलं! WHOच्या तज्ज्ञांची टीम 'या' तारखेला देणार वुहानमध्ये भेट
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus