पेस्ट कंट्रोलनंतर दुर्लक्षपणा बेतला दाम्पत्याच्या जीवावर; तुम्हीही असा हलगर्जीपणा करू नका, 'या' चुका टाळा

पेस्ट कंट्रोलनंतर (Pest Control) दारं, खिडक्या बंद करून घरात राहणाऱ्या पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

पुणे, 13 फेब्रुवारी : घरातील झुरळं, उंदीर, पाल आणि इतर कीटकांपासून मुक्ती मिळण्याचा एक मार्ग म्हणजे पेस्ट कंट्रोल (pest control). आपण आपल्या घरात पेस्ट कंट्रोल करून घेतो. मात्र योग्य ती काळजी घेत नाही आणि अशीच काळजी घेतल्याने पुण्यातल्या दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. पेस्ट कंट्रोलनंतर दारं, खिडक्या बंद करून टीव्ही पाहत बसणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तुमच्या घरात पेस्ट कंट्रोल करताना काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घ्या.

पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी काय कराल?

पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती करून घ्या

ज्यांच्याकडून पेस्ट कंट्रोल करून घेणार आहेत, त्यांच्याकडून प्रक्रिया समजून घ्या

कोणतं पेस्ट कंट्रोल उत्पादन वापरणार आहे, त्याबाबत माहिती असू द्या

प्राण्यांना आणि लहान मुलांना सुरक्षित जागी ठेवा

घरात कचरा असल्यास काढून टाका, घर स्वच्छ ठेवा

घरात कोणत्याही प्रकारचे पदार्थ उघडे ठेवू नका.

काही गोष्टी एअरटाइट डब्यात बंद करून ठेवा, तर काही प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवा

घरातील इतर सर्व वस्तू नीट प्लास्टिकमध्ये झाकून ठेवा, विशेषत प्राणी आणि मुलांची खेळणी आणि त्यांच्या इतर वस्तू

हेदेखील वाचा - धक्कादायक! पेस्ट कंट्रोलनंतर केलं दुर्लक्ष, पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यू

पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काय कराल?

घराची दारं, खिडक्या खुली ठेवा

पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला जे काही करण्याचा सल्ला दिला आहे, ते करा

घरात किती वेळाने यायचं याबाबत विचारा

घरात चुकून कोणताही पदार्थ उघडा राहिला असेल तर तो फेकू दया

पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर लगेचच घर स्वच्छ करू नका

घरात असलेलं पेस्टिसाइड वापरू नका

काही गोष्टी हाताळताना ग्लोव्हजची गरज असेल तर ते घाला

आरोग्याच्या कोणत्याही समस्या दिसल्यास डॉक्टरांकडे जा

पेस्ट कंट्रोलचे तुमच्या आरोग्यावर परिणाम झाल्याची लक्षणं

घशासी समस्या

श्वास घेताना अडथळे

चक्कर येणं

मळमळ

उलटी

डोकेदुखी

त्वचेला खाज

त्वचेवर रॅशेस

हेदेखील वाचा - पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला? संशोधनात समोर आली धक्कादायक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 03:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading