मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pune: 80 टक्के पुणेकरांना मानसिक समस्या; संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती

Pune: 80 टक्के पुणेकरांना मानसिक समस्या; संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती

 सध्याचं जीवन धावपळीचं-धकाधकीचं आहे, याबद्दल आपण काही ना काही वाचत असतो, दररोज ते अनुभवतही असतो.

सध्याचं जीवन धावपळीचं-धकाधकीचं आहे, याबद्दल आपण काही ना काही वाचत असतो, दररोज ते अनुभवतही असतो.

सध्याचं जीवन धावपळीचं-धकाधकीचं आहे, याबद्दल आपण काही ना काही वाचत असतो, दररोज ते अनुभवतही असतो.

    मुंबई, 11 ऑगस्ट-   सध्याचं जीवन धावपळीचं-धकाधकीचं आहे, याबद्दल आपण काही ना काही वाचत असतो, दररोज ते अनुभवतही असतो. या धकाधकीच्या जीवनामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक ताण मोठ्या प्रमाणावर सोसावे लागतात. मुंबईच्या तुलनेत शांत समजल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या शहरात दर पाचपैकी चौघांना मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवतात, ही आकडेवारी या संदर्भात पुरेशी बोलकी आहे. ही आकडेवारी एम-पॉवर या मानसिक आरोग्य सेवा पुरवठादार कंपनीने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणाची आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. एम-पॉवर हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टतर्फे चालवला जाणारा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधल्या नागरिकांचं मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात आलं. त्याचा मेंटल हेल्थ स्कोअर अर्थात मानसिक आरोग्य गुण नुकतेच सादर करण्यात आले. त्यानुसार, पुणे-पिंपरी-चिंचवडमधल्या पाचपैकी चार म्हणजेच सुमारे 80 टक्के नागरिकांना कोणती ना कोणती मानसिक आरोग्यविषयक समस्या जाणवत आहे. ही आकडेवारी आता विस्ताराने पाहू. 'एम-पॉवर'च्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीरजा बिर्ला यांनी 10 ऑगस्ट रोजी याबद्दलची माहिती जाहीर केली. 18-24, 25 ते 40 आणि 60 वर्षांवरच्या अशा वयोगटांमध्ये हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 85 टक्के महिला आणि 70 टक्के पुरुषांना मानसिक आरोग्याचा ताण सहन करावा लागला आहे. महिलांमध्ये याचं प्रमुख कारण डिप्रेशन हे आहे, तर पुरुषांमध्ये चिंता अर्थात Anxiety आणि पॅनिक डिसॉर्डर ही प्रमुख कारणं आहेत. 18 ते 24 वयोगटातल्या 88 टक्के जणांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत. तसंच, पुण्यातल्या या वयोगटातल्या तरुणांना जाणवत असलेल्या प्रमुख मानसिक समस्या म्हणजे मूड डिस्टर्बन्सेस आणि Anxiety. त्याशिवाय अनेकांना पॅनिक डिसॉर्डर, रिलेशनशिपमध्ये अस्थिरता, धोका-विश्वासघात, छळ, ओपन रिलेशनशिप, घोस्टिंग अशा समस्याही भेडसावत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (हे वाचा:प्रोफेशनल लाईफमुळे पर्सनल लाईफवर होतोय परिणाम? या टिप्सचा होईल फायदा ) 'एम-पॉवर'च्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीरजा बिर्ला  यांनी सांगितलं, 'आम्ही एम-पॉवरच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल देशात जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करतो. गरजू व्यक्तींना मदत मागण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देतो. एखाद्या शहराशी निगडित असलेला मेंटल हेल्थ स्कोअर जाहीर करून आम्ही हे दर्शवू इच्छित आहोत, की मानसिक आरोग्य हा काही आता लपवण्याचा विषय राहिलेला नाही. मानसिक आरोग्याची समस्या कोणत्याही वयोगटातल्या, कोणत्याही ठिकाणच्या आणि कोणत्याही भवतालातल्या व्यक्तींना जाणवू शकते. कोरोना महामारीच्या काळात एकटेपणा, अस्थिरता, चिंता सर्वांनी अनुभवली. त्यामुळे मानसिक समस्या वाढीला लागल्या. मानसिक समस्या आहे हे ओळखून ते मान्य करणं आणि त्यावर उपायासाठी प्रोफेशनल मदत घेणं या गोष्टींची गरज आहे. कारण मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे जीवनातला आनंद तर जातोच; पण त्याचा अप्रत्यक्ष परिणाम देशाची उत्पादकता आणि विकासावरही होतो. त्यामुळे या समस्या ओळखून त्यावर उपचार घेण्यासाठी पुढे आलं पाहिजे.'
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Pune

    पुढील बातम्या