पुणे, 3 जुलै : व्यक्तिमत्वाची छाप पाडण्यासाठी आणि स्वतः ची खास इमेज तयार करण्यासाठी अनेकजण परफ्यूम्स वापरत असतात. परफ्युमचा मंद सुगंध शरीर आणि मन दोन्हीही ताजेतवाने करत असतो. त्यामुळे परफ्युम्सची आवड असणारी मंडळी सतत नवनवीन व्हरायटीज आणि ब्रँड्स शोधत असतात. या मंडळींसाठी पुण्यातील एका खास मार्केटची माहिती आम्ही देणार आहोत. पुण्यातील ‘फा फ्रॅग्रन्स अँड ब्युटी केअर’ जिथे चक्क 100 पेक्षा जास्त इंटरनॅशनल क्वॅलिटीच्या परफ्युम्सचे क्लोन्स मिळतात. येथील खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष ग्राहकांच्या समोर परफ्यूम्स बनवले जातात आणि कस्टमाइज्ड करून दिले जातात. जगभरात कुठंही लॉन्च होणारा परफ्युम इथं 15 दिवसांमध्ये उपलब्ध करून दिला जातो.
या शॉपचे मालक फिरोज अत्तर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. अत्तर म्हणाले की, ‘आमचे गेल्या 15 वर्षांपासून पुण्यात शॉप आहे. इथं आम्ही 1000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परफ्युमची विक्री करतो. हे परफ्युम्स आम्ही स्वत: बनवतो आणि त्याची देशात तसंच देशाबाहेरही विक्री होते. हे परफ्युम 8 तासांपेक्षा जास्त राहिलं याची आमची गॅरंटी असते. 24 तासांपेक्षा जास्त काळ याचा सुवास राहतो. आमचे संपूर्ण जगभरात ग्राहक आहेत. इंडियन स्टाईल, अरेबिक स्टाईल, वेस्टर्न स्टाईल, इम्पोर्टेड असे सगळेच कॉम्बिनेशन आमच्याकडं मिळतात. लोकल बाजारामधील परफ्युममध्ये मिथेनॉलचा वापर केला जातो. आमचे परफ्युम मिथेनॉलमुक्त आहे. त्यामुळे यामध्ये कॅन्सरचा धोका नसतो, असा दावा फिरोज यांनी केला. 12 हजार रुपयांत पाहिजे आयफोन? पुण्यातील या मार्केटमध्ये आहे खरेदीची संधी ‘आमच्याकडे ग्राहकांना त्यांना हवे तसे ‘कस्टम मेड’ परफ्यमुम दिले जातात. तुम्हाला आवडणारा परफ्युम घेऊन आल्यास त्याच प्रकारचा सुंगध असलेला परफ्युम तुमच्या समोर तयार करून दिला जातो. आमच्याकडील सर्वात स्वस्त परफ्युमची किंमत 700 रुपये आहे. त्यानंतर ब्रँडनुसार दर बदलत जातो. चंदनाच्या एका परफ्युमची किंमत 80 हजार रुपये तोळा आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

)







