मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पुण्यात रोबोनं केली कमाल! कोणत्याही अवयवांना हानी न पोहोचवता केली कॅन्सर सर्जरी

पुण्यात रोबोनं केली कमाल! कोणत्याही अवयवांना हानी न पोहोचवता केली कॅन्सर सर्जरी

रुग्णाला अतिशय संवेदनशील भागात कॅन्सर (CANCER) होता. ज्यामुळे सामान्य सर्जरीत (SURGERY) इतर अवयवांना कायमची हानी पोहोचण्याची शक्यता होती.

रुग्णाला अतिशय संवेदनशील भागात कॅन्सर (CANCER) होता. ज्यामुळे सामान्य सर्जरीत (SURGERY) इतर अवयवांना कायमची हानी पोहोचण्याची शक्यता होती.

रुग्णाला अतिशय संवेदनशील भागात कॅन्सर (CANCER) होता. ज्यामुळे सामान्य सर्जरीत (SURGERY) इतर अवयवांना कायमची हानी पोहोचण्याची शक्यता होती.

  • Published by:  Priya Lad
पुणे, 30 डिसेंबर : 65 वर्षांच्या रेखा (नाव बदलेलं) यांना  शौच करताना खूप त्रास होत होता. शौचास नीट होत नव्हतं, शिवाय त्यावेळी रक्तही पडत होतं. त्यांना हा होणारा हा त्रास इतका वाढला की अखेर त्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालयात गेल्या. तिथं त्यांना डॉक्टरांनी काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला. तपासणीत रेखा यांना रेक्टल कॅन्सर (Rectal cancer) असल्याचं निदान झालं. त्यांच्या रेक्टममध्ये (rectum) घातक ट्युमर (malignant tumour)  होता. शिवाय मूत्राशयात स्टोनही (gallbladder stones) होते. डॉक्टरांसमोर रेखा यांच्या शस्त्रक्रियेचं सर्वात मोठं आव्हान होतं. कारण हा ट्युमर गुद्द्द्वाराजवळ अगदी नाजूक ठिकाणी होता आणि तिथल्या भागाला हानी न पोहोचवता सर्जरी करायची होती आणि डॉक्टरांसोबत हे आव्हान पेललं ते रोबोनं. इतर कोणत्याही अवयवांना हानी न पोहोचवता रोबोनं ही सर्जरी यशस्वी केली आहे. पुण्यातील (pune) रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) रेख यांची रेक्टम सर्जरी झाली. रेक्टम सर्जरीमध्ये (rectum surgery) गुद्द्वाराजवळील भाग वाचवणं सर्वात मोठं आव्हान होतं. अनेक रुग्णांना याचीच चिंता असते. काही प्रकरणांमध्ये गुद्दद्वाराजवळ शौचावेळी आकुंचन आणि प्रसरण पावणारे स्नायू ज्यामुळे शौचावर नियंत्रण राहतं असे स्नायूही वाचवता येत नाहीत. यामुळे ओटीपोटावर असा कायमचा खुला असलेला भाग बनवावा लागतो जिथून शरीरातील टाकाऊ घटक एका बॅगेत जमा होतील, याला वैद्यकीय भाषेत स्टोमा (stoma) असं म्हणतात. पण रोबोटिक सर्जरीमुळे (robotic surgery) हे सर्व टाळता येतं. एक तात्पुरता स्टोमा तयार करण्यात येतो. ज्याची सहा आठवड्यांनंतर गरज पडत नाही. त्यानंतर रुग्ण सामान्यपणे नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे शौच करू शकतो.  त्यामुळे रेखा यांच्यावर रोबोटिक कॅन्सर सर्जरी करण्यात आली. हे वाचा - 5 वर्षांत 4 कॅन्सर, पण खचला नाही पुणेकर; महाभंयकर आजाराशी जिद्दीनं लढतोय रुबी हॉल क्लिनिकमधील ऑन्कोसर्जरी, रोबोटिक सर्जरी, जीआय सर्जरीचे कन्सलटंट डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी सांगितलं, "रुग्णाचं सीटी स्कॅन आणि कोलोनोस्कोपी करण्यात आली. त्यावेळी तिथं एक ट्युमर असल्याचं दिसलं आणि कॅन्सर असल्याचंही निदान झालं. त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यातील रेक्टम कॅन्सर होता. त्यासाठी केमोथेरेपी आणि रेडिएशन थेरेपी घेण्यास सांगण्यात आली. जेणेकरून ट्युमर कमी होईल. याचवेळी रुग्णाच्या मूत्राशयातही स्टोन असल्याचं दिसलं" डॉ. कुलकर्णी म्हणाले, "केमोथेरेपी आणि रेडिएशन झाल्यानं आम्ही रुग्णाला रोबोटिक सर्जरीचा पर्याय दिला. ओपन सर्जरीमध्ये ट्युमर पूर्णपणे काढणं म्हणजे खूप आव्हानात्मक होतं. कारण कॅन्सरची गाठ गुद्द्द्वाराच्या अगदी जवळ होती. त्यामुळे तिथले महत्त्वाचे अवयव आणि आजूबाजूच्या भागाला हानी पोहोचून न देणं हे आमच्यासाठी खूप गरजेचं होतं. जेणेकरून रुग्णाला भविष्यात त्रास होणार नाही. पण रोबोटिक सर्जरीमुळे ट्युमर आणि तेथील लिम्फ नोड्समध्ये पूर्णपणे काढणं खूप सोपं झालं. याच सर्जरीमुळे मूत्राशयातील स्टोनही काढण्यात आले. यासाठी जवळपास 5 तास लागले" हे वाचा - सुंदर नाकाचा मोह मुलीला पडला महागात, प्लास्टिक सर्जरी कापावे लागले दोन्ही पाय थ्री डी व्हिजन असलेल्या या रोबोच्या हातांची हालचाल अगदी सर्जन्सच्या बोटांप्रमाणेच होते. हा रोबो इतक्या उत्तमपणे सर्जरी करतो ज्यामुळे नर्व्हना कमी हानी पोहोचते आणि कमीत कमी रक्त जातं. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊन त्याला रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळतो. रेखादेखील या पद्धतीच्या ऑपरेशनमुळे बऱ्या झाल्या आणि त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. शिवाय कोरोनाच्या काळातही ही सर्जरी महत्त्वपूर्ण ठरली. या सर्जरीमुळे डॉक्टर आणि रुग्णाचा संपर्क कमी आला. रुबी हॉल क्लिनिकचे सीओओ डॉ. मनीषा करमकर म्हणाल्या, आम्ही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि तो यशस्वीही होतो. जगातील सर्वोत्तम अशी रोबोटिक सर्जरी उपलब्ध करून देणं हे आमचं ध्येय आहे.
First published:

Tags: Cancer, Surgery

पुढील बातम्या