चिनी PUBG ऐवजी आता भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारकडून मेड इन इंडिया गेमची घोषणा

चिनी PUBG ऐवजी आता भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारकडून मेड इन इंडिया गेमची घोषणा

चीनी PUBG भारतात बॅन होताच भारतीय FAU-G ची घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 सप्टेंबर : देशाच्या सुरक्षेसाठी भारताने 118 चाइनीज अॅप्सवर (chinese app) बंदी घातली. त्यामध्ये भारतात सर्वाधिक पसंतीच्या PUBG गेमचाही समावेश आहे. त्यामुळे पब्जी गेमला काय पर्याय आहे, याचा शोध अनेक जण घेऊ लागले. आता पब्जीप्रेमींसाठी एक खूशबर ती म्हणजे चिनी पब्जीप्रमाणेच आता भारतात  FAU-G गेम लाँच होणार आहे. खिलाडी अक्षय कुमारनेच या मेड इन इंडिया गेमची घोषणा केली आहे.

2 सप्टेंबरला चिनी PUBG बॅन होताच दोन दिवसांत भारतात FAU-G गेमची घोषणा करण्यात आली आहे. Fearless and United: Guards असं या गेमचं पूर्ण नाव आहे. हा गेम बंगळुरूतील कंपनी nCORE गेम्स रिलीज करणार आहे.  अक्षय कुमार या गेमचा पहिला गेमिंग वेंचर आहे. अक्षयने आपल्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

"पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत चळवळीचं समर्थन करत हा अॅक्शन गेम आणताना मला खूप अभिनान वाटतो आहे. Fearless And United-Guards FAU-G. गेम्समधून मनोरंजनाशिवाय प्लेअर्सना सैनिकांना किती बलिदान द्यावं लागतं, हेदेखील समजू शकेल. या गेममधून होणाऱ्या कमाईचा 20% भाग भारत के वीर ट्रस्टला दिला जाणार आहे", असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं आहे.

हे वाचा - PUBG BAN मग काय झालं! पब्जीसारख्या 6 Games मध्ये दाखवा तुमची कमाल

GOQii  चे सीईओ विशाल गोंडल यांनी FAU:G  ला आत्मनिर्भर भारताचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. विशाल हे एनकोर गेम्सचे गुंतवणूकदारही आहेत. दरम्यान हा गेम कधी लाँच होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसंच हा गेम मोबाइल की डेस्कटॉपसाठी असेल हेदेखील जारी करण्यात आलेलं नाही.

Published by: Priya Lad
First published: September 4, 2020, 7:58 PM IST

ताज्या बातम्या