Home /News /lifestyle /

Parenting Tips : लहान मुलांचं मानसिक आरोग्य जपणं आहे एक आव्हान, 'या' उपायांनी मुलं राहतील आनंदी

Parenting Tips : लहान मुलांचं मानसिक आरोग्य जपणं आहे एक आव्हान, 'या' उपायांनी मुलं राहतील आनंदी

Parenting Tips: मुलांना मानसिकदृष्ट्या निरोगी आणि कणखर बनवण्यासाठी (Child’s Mental Health) योग्य पालकत्व शैली आणि सकारात्मक कौटुंबिक वातावरण अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागतात.

पुढे वाचा ...
  मुंबई, 23 जून : बदलत्या काळानुसार केवळ प्रौढच नाही तर लहान मुलांनाही मानसिक विकार होत आहेत. त्यांनाही विविध कारणांमुळे चिंता, तणाव, अस्वस्थता आणि नैराश्य जाणवते. लहान मुलांना दुःखी आणि तणावग्रस्त वाटण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कौटुंबिक वातावरण. त्यामुळे मुलांना मानसिकदृष्ट्या निरोगी आणि कणखर बनवण्यासाठी (Child’s Mental Health) योग्य पालकत्व शैली (Parenting Tips) आणि सकारात्मक कौटुंबिक वातावरण अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांना आनंदी आणि मनोसोक्त हसताना पाहायचंय ? मग या सोप्या टिप्स (Dos and Don’ts With Your Child) फॉलो करा. मुलांना आनंद देण्यासाठी हे करा... मुलांशी मोकळेपणाने बोला मुलं प्रामाणिक असतात आणि मोकळेपणाने बोलल्यास (Talk Openly) ते सहजपणे व्यक्त होतात. त्यांच्याशी संभाषण सुरू करा आणि त्यांना त्यांच्या दिवसाबद्दल आणि जीवनाबद्दल विचारा. त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होत आहे का ते विचारा आणि नंतर त्यांनी हायलाइट केलेल्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. वाईट बातम्या आणि मोबाईल गेमपासून शक्य तितके दूर ठेवा मोबाईल गेम्स आणि नकारात्मक बातम्यांमुळे तुमच्या मुलांच्या मनावर नकळत त्याचा वाईट परिणाम होत असतो (Keep Away Chidren From Bad News And Mobile Games) आणि त्यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतात. त्यांचे अवचेतन मन नकारात्मक गोष्टी ग्रहण करते आणि त्यांना केवळ त्याच सर्व गोष्टींचा विचार करायला लावते. त्यामुळे मुलं सकारात्मक गोष्टी पाहात आहेत याची खात्री केली पाहिजे. तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसोबत असता तेव्हा सकारात्मकच बोलले पाहिजे.

  काय सांगता काय? हाय हील्स सँडल्स पहिल्यांदा स्त्रियांसाठी नव्हे, तर पुरुषांसाठी करण्यात आले होते विकसित

  मुलांसोबत खेळा तुमच्या मुलांना तुमची सर्वात जास्त गरज असते. तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनातून थोडा वेळ काढून तुमच्या मुलानांसोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. यामुळे मुलांना सुरक्षित वाटते आणि त्यांचे तुमच्याशी घट्ट नाते निर्माण होऊ लागते. त्यांच्याबरोबर त्यांचे आवडते खेळ खेळा (Play With Child) आणि ते काय म्हणतात ते ऐका. मुलांसोबत या गोष्टी अजिबात करू नका... जोडीदाराशी भांडण पालकांमधील वाद मुलांना खूप सहजपणे ओळखता येतो. ते त्यांच्या पालकांना घाबरतात (Don't Fight Infront Of Child) आणि त्यांच्या मोठ्या आवाजामुळे आणि मतभेदांमुळे त्यांच्यापासून अंतर निर्माण करतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांचा आनंद हवा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मुलांसमोर अजिबात भांडू नका. मुलांवर ओरडणे मुले अनेक आणि काहीही प्रश्न विचारू शकतात. आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देतो. मात्र अनेकदा ताणतणावामुळे (Don't Shout At Child) तुम्ही त्यांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे चिडू शकता. परंतु अशावेळी त्यांच्यावर ओरडणे हा उपाय नाही. तुमच्या मुलांशी कधीही आक्रमकपणे वागू नका कारण ते त्यांच्यावर दीर्घकाळ टिकणारे प्रभाव निर्माण करू शकतात.

  पावसळ्यातही उजळेल तेलकट चेहरा, 'या' सोप्या उपायांची करा अंमलबजावणी

  मुलांकडे दुर्लक्ष करू नका पालक म्हणून तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम सेट करू शकता. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तुमच्या मुलाला त्यांच्या आजी आजोबा (Don't Ignore Child) किंवा काळजीवाहूंसोबत काही काळ सोडणे ठीक आहे. मात्र त्यांना वारंवार एकटे सोडल्याने ते तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Parents and child

  पुढील बातम्या