मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गरोदर महिलेचे डोहाळे पाहताना तुम्हीही व्हाल चकित; जाहिरात का आली चर्चेत?

गरोदर महिलेचे डोहाळे पाहताना तुम्हीही व्हाल चकित; जाहिरात का आली चर्चेत?

गर्भवती महिलेने सोनं, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने घालण्याऐवजी तिच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ज्या पदार्थ आणि फळांत लोह मुबलक प्रमाणात असतं त्या फळांपासून तयार केलेले दागिने द्या, असा मेसेज या जाहिरातीतून देण्यात आलाय.

गर्भवती महिलेने सोनं, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने घालण्याऐवजी तिच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ज्या पदार्थ आणि फळांत लोह मुबलक प्रमाणात असतं त्या फळांपासून तयार केलेले दागिने द्या, असा मेसेज या जाहिरातीतून देण्यात आलाय.

गर्भवती महिलेने सोनं, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने घालण्याऐवजी तिच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ज्या पदार्थ आणि फळांत लोह मुबलक प्रमाणात असतं त्या फळांपासून तयार केलेले दागिने द्या, असा मेसेज या जाहिरातीतून देण्यात आलाय.

पुढे वाचा ...

  मुंबई, 1 जून : प्रेग्नन्सी (Pregnancy) हा कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सुंदर काळ असतो. गरोदरपणाच्या काळात महिलांच्या शरीरामध्ये वजन वाढण्यापासून अनेक बदल होतात. त्यामुळे या काळात गर्भवतींची विशेष काळजी घ्यायला सांगितलं जातं. त्यांना बाळाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्त्वयुक्त पदार्थ खायला दिले जातात. प्रेग्नन्सीच्या काळात महिलांच्या शरीरात लोह म्हणजेच आयर्न (Iron) कमी होतं. त्यामुळे त्यासाठी डॉक्टर काही खाद्यपदार्थ आणि औषधं सुचवतात.

  खरं तर प्रत्येकच महिलेच्या शरीरात लोह मुबलक प्रमाणात असणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान महिलांना त्याची खूप गरज असते. भारतात अनेक महिलांना गरोदरपणात लोहाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिला आणि तिच्या पोटातील बाळाच्या शरीरावर याचा खूप वाईट परिणाम होतो. गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते, त्यामुळे अनेक शासकीय आणि सामाजिक संस्था याबद्दल जनजागृती करत असतात.

  भारतीय महिलांमध्ये याबाबत जागरुकता आणण्यासाठी 'प्रोजेक्ट स्त्रीधन'ने नुकतीच एक जाहिरात केली आहे. यात गर्भवती महिलेचा ओटीभरण कार्यक्रम दाखवला आहे. यात गर्भवती महिलेने सोनं, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने घालण्याऐवजी तिच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी ज्या पदार्थ आणि फळांत लोह मुबलक प्रमाणात असतं त्या फळांपासून तयार केलेले दागिने द्या, असा मेसेज या जाहिरातीतून देण्यात आलाय. अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) ही जाहिरात तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. यासंदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

  या जाहिरातीत गर्भवती महिलांच्या शरीरातील रक्ताची कमतरता हे अशक्तपणाचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. गर्भवती महिलेला अॅनिमिया (Anemia) असेल तर त्याचा वाईट परिणाम तिच्या मुलावरही होतो. या जाहिरातीमध्ये महिलेला डाळिंब, चेरी, लाल बेरी यासारखी लोहयुक्त फळं आणि कॉर्न खाताना दाखवण्यात आलंय. जाहिरातीत दाखवलेल्या या ओटी भरण आणि डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात गर्भवती महिलेसाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यात गुंतवणूक करण्याऐवजी, त्यांच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी योग्य आणि पूरक आहारात गुंतवणूक करा, असा मेसेज देण्यात आला आहे. जाहिरातीत एक हिंदी गाणं वाजतंय त्यामध्येही मला सोन्या-चांदीचे दागिने नको तर शरीरातील लोहाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक लोहाचे दागिने म्हणजे लोहयुक्त पदार्थ द्या, असं म्हटलं जातंय.

  यापूर्वीही आल्या आहेत अशा जाहिराती

  गर्भवती महिलांची काळजी घ्या, असा संदेश देणारी ही पहिली जाहिरात (Advertisement) नाही. याआधीही महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर महिलांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये महिलांना धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यावर पैसे खर्च करण्याऐवजी शरीरातील लोहामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला होता म्हणजे लोहयुक्त पदार्थ खाण्यासाठी पैसे खर्च करा असं सांगितलं होतं.

  अॅनिमियाबद्दल नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे काय सांगतो?

  नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या (NFHS) अहवालानुसार, भारतातील अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अलीकडच्या काळात लहान मुलं आणि महिलांमध्ये अॅनिमियाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात 68.4 टक्के मुलं आणि 66.4 टक्के महिलांना अॅनिमिया होता. तर 2016 मध्ये 35.7 टक्के मुलं आणि 46.1 टक्के महिलांना अॅनिमियाचा त्रास होता.

  ग्लोबल न्यूट्रिशन सर्व्हे काय सांगतो?

  2016 च्या जागतिक पोषण सर्वेक्षण म्हणजेच ग्लोबल न्यूट्रिशन सर्व्हेनुसार भारतात मोठ्या प्रमाणात महिलांना अॅनिमियाचा त्रास आहे. महिलांमधील अॅनिमियाच्या बाबतीत भारत जगातल्या 180 देशांमध्ये 170 व्या क्रमांकावर आहे. तर, WHO च्या एका अहवालानुसार, 15 ते 49 वर्षे किंवा 12 ते 49 वर्षे वयोगटातील महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी 12 ग्रॅम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी असते आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी 11.0 ग्रॅम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी असण्यास त्याला अॅनिमिया आहे, असं समजलं जातं.

  प्रेग्नन्सीदरम्यान अॅनिमियाची लक्षणं कोणती?

  थकवा, डोकेदुखी, त्वचा पिवळी पडणं, श्वास घेण्यास त्रास, बर्फ किंवा एखादा पदार्थ खावासा वाटणं, ब्लड प्रेशर कमी (Low BP) होणं आणि एकाग्रता कमी होणं, ही अॅनिमियाची प्रमुख लक्षणं आहेत.

  गर्भधारणेदरम्यान शरीरात लोहाच्या कमतरतेचं कारण काय?

  आपलं शरीर हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह वापरतं. हिमोग्लोबिन (Haemoglobin) हे शरीराच्या सर्व ऊतींपर्यंत ऑक्सिजन (Oxygen) पोहोचवणारं एक प्रकारचं प्रोटिन आहे. गर्भधारणेदरम्यान, शरीरातील रक्ताची गरज वाढते, ती पूर्ण करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. पोटातल्या बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा, यासाठी गर्भवती महिलेच्या शरीरात जास्त रक्त तयार करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. परंतु, अशा परिस्थितीत महिलांच्या शरीराच्या गरजेनुसार लोहाचं प्रमाण नसेल तर त्यांना अॅनिमिया होऊ शकतो.

  अॅनिमियाची समस्या दूर करण्याचे उपाय

  गरोदरपणात डॉक्टर महिलांना आयर्न सप्लिमेंट देतात जेणेकरून त्यांच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढता येईल. गर्भवती महिलांना दिवसाला 27 मिलीग्राम लोहाची गरज असते. आहारात पोषक घटकांचा समावेश करून लोहाची कमतरता भरून काढता येते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास गर्भवती महिलांनी हिरव्या भाज्या, सोयाबीन, वाटाणे, टोमॅटो याचा आहारात समावेश करावा आणि ऑरेंज ज्यूसचे सेवन करावे.

  First published:

  Tags: Health Tips, Pregnancy, Women