मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जगभरात तरुणांनाही ग्रासलंय हायपरटेन्शननं, वेळीच रोखण्यासाठी करा हे उपाय

जगभरात तरुणांनाही ग्रासलंय हायपरटेन्शननं, वेळीच रोखण्यासाठी करा हे उपाय

जीवनशैलीविषयक आजार आणि समस्या आधुनिक जगात वाढत आहेत. हायपरटेन्शनही त्यापैकीच एक आहे.

जीवनशैलीविषयक आजार आणि समस्या आधुनिक जगात वाढत आहेत. हायपरटेन्शनही त्यापैकीच एक आहे.

जीवनशैलीविषयक आजार आणि समस्या आधुनिक जगात वाढत आहेत. हायपरटेन्शनही त्यापैकीच एक आहे.

 मुंबई, 06 जानेवारी, : काही सर्वेक्षणांमधून समोर आलेल्या वास्तवानुसार दर 10 पैकी 3 भारतीय हायपरटेन्शननं ग्रस्त आहेत. हायपरटेन्शन (Hypertension) अपंगत्वासह मृत्यूचंही (death) कारण बनतो आहे. 2013 ते 2030 च्या दरम्यान जगात हायपरटेन्शनच्या केसेस जवळपास 8 टक्के वाढतील असाही तज्ञांचा अंदाज आहे.

काय आहेत लक्षणं? (symptoms)

अनेक लोकांमध्ये हायपरटेन्शनचं कुठलंच लक्षण दिसत नाही. काही लोकांना चक्कर येते. काही केसेसमध्ये छाती आणि डोकं दुखणं हे दिसू शकतं. अनेकांना वर्षानुवर्षे हायपरटेन्शन असतं तरीही त्यांना ते ओळखता येत नाही.

हायपरटेन्शनचा जास्त धोका कुणाला

याचा अधिक धोका स्ट्रेस (stress) आणि एन्गझायटीग्रस्त (anxiety) व्यक्तींना असतो. मधुमेह आणि किडनीच्या विकारांनी ग्रस्त लोकांनाही याचा धोका असतो. गरोदर महिला किंवा ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांनाही अधिक धोका असतो.

आजच्या युगात कमी वयातच हायपरटेन्शनचा बळी होण्याचं प्रमाण वाढतं आहे. स्पर्धा, खूप जास्त काम, गळेकापू चढाओढ, अनेक अदृश्य ताण यातून हे सगळं तरुणांमध्ये उद्भवत आहे. कॉर्पोरेट कल्चरमध्ये (corporate culture) काम करणाऱ्या तरुणांकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. कामाचे तास अनिश्चित आहेत. वाढत्या प्रदूषणामुळेही (pollution) अनेकांना हायपरटेन्शनचा सामना करावा लागतो आहे.

यावर उपाय काय? remedies

हायपरटेन्शनला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्यदायी आहार नियमितपणे घेणं खूप महत्त्वाचं आहे. सोबत पुरेशी शारीरिक हालचाल, विशिष्ट प्रकारचा व्यायाम आवश्यक आहे. वजन सतत नियंत्रणात असलं पाहिजे. मीठ कमी खाणं हेसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. धूम्रपान वेळीच बंद केलं पाहिजे. मद्यपान नियंत्रणात ठेवलं पाहिजे. ताण असेल तर त्याचं वेळीच शास्त्रीय पद्धतीनं व्यवस्थापन केलं पाहिजे.

First published:

Tags: Stress