झोपेत वाईट स्वप्न पडतात? मग तुम्हाला असू शकतो 'हा' आजार

तुम्हाला सतत झोपेत वाईट स्वप्न येतात का? तुमचं कामावर लक्ष केंद्रित होत नाही का? जर तुमचं उत्तर हो असेल तर,वेळीच सावधान व्हा. तुम्हाला येणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे मानसिक आरोग्याशी निगडीत आजार होऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 06:30 AM IST

झोपेत वाईट स्वप्न पडतात? मग तुम्हाला असू शकतो 'हा' आजार

मुंबई, 20 जुलै : दिवसभर दगदग केल्यावर शरीराला पुरेशी विश्रांती आणि झोप ही मिळणे आवश्यक आहे. झोप व्यवस्थित नाही झाली की त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. म्हणजे चांगली झोप हा आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. पण, तुम्हाला सतत झोपेत वाईट स्वप्न पडतात का? तुमचं कामावर लक्ष केंद्रित होत नाही का? जर तुमचं उत्तर हो असेल तर, वेळीच सावध व्हा. तुम्हाला पडणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे मानसिक आरोग्याशी निगडीत आजार होऊ शकतो. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं. या आजाराचं नाव आहे PTASD म्हणजेच पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत शुक्ला यांनी याविषयी अधिक माहिती दिली. हा आजार झालेली व्यक्ती नेहमीपेक्षा जास्त रागीट आणि चिडचिडी होते. छोट्या-छोट्या गोष्टींवर त्यांची चिडचिड होते. PTASD हा असा आजार आहे ज्यामध्ये भूतकाळातील घटना वर्तमानात म्हणजे चालू काळात समोर येतात. त्या पुन्हा स्वप्नांतून तुमच्या मनावर हल्ला करतात. त्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो, अशी माहिती डॉ. शुक्ला यांनी दिली.

हे ही वाचा : प्रवासात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्याला आहेत धोकादायक

लहानपणी झालेल्या काही घटनांमुळे, प्रसंगांमुळे किंवा घरातील ताणतणावामुळे PTASD होण्याची शक्यता असते.

पीटीएसडी ची लक्षण

Loading...

मुख्य लक्षण म्हणजे, वेळेपेक्षा लवकर जाग येणे आणि झोपेत वाईट स्वप्न बघणे.

एकच प्रसंग किंवा घटना वारंवार दिसणे, त्याविषयी सतत विचार येणे.

विस्मरण, स्मरणशक्तीमध्ये अडथळा.

लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता कमी होणे.

अतिसावध झोप असणे.

अचानक राग येणे आणि हिंसक होणे.

अचानक घाबरून दचकणे.

सतत घाबरणे, भीती निर्माण होणे आणि सततची काळजी

मांसपेशींमध्ये विनाकारण दुखणे.

गरजेपेक्षा जास्त लाजणे.

वाचा : पावसाळ्यात या शहरांमध्ये फिरण्याचा प्लॅन करू नका, खराब होईल ट्रीप

अतिभावूक होणे.

प्रसंगाशी निगडीत इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे.

काय आहेत उपचार? sleeping disorder

आपण काय विचार करतो, दिवसभर कसे वागतो याच गोष्टी झोपल्यावर स्वप्नात येतात. त्याच्यावर उपचार म्हणून मनोविश्लेषक सल्ला देण्याचं काम करतात. त्याने हा आजार कमी होतो. कौन्सेलिंग करून मानसोपचार तज्ज्ञ अशा व्यक्तींना मार्गदर्शन करतात. 'मूड एलिवेटर' या थेरेपीची वापर केला जातो. यामध्ये हिप्नोटाईज करून समस्येविषयी माहिती घेतली जाते. झालेल्या प्रसंगामधून व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी या थेरेपीची मदत होते.

आवडीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत त्यांवर अधिक भर दिला जातो. जेणेकरून त्यांच्या विचारात सुधार होईल व सकारात्मक विचार वाढतील.

कॉगनेटिव्ह बिहेवेरिअल थेरपीमध्ये भूतकाळात झालेल्या वाईट घटनांविषयी विचारपूस करून रुग्णाला त्याविषयी बोलतं केलं जातं.

VIDEO : विषय शेतकरी कर्जमाफीचा पण प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...