नवरा निक जोनसनं शेअर केला Birthday Girl प्रियांका चोप्राचा VIDEO; ड्रेस आणि बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क

नवरा निक जोनसनं शेअर केला Birthday Girl प्रियांका चोप्राचा VIDEO; ड्रेस आणि बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रियांका चोप्राचा वाढदिवसाच्या ड्रेसमधला एक धम्माल व्हिडिओ नवरा निक जोनसने शेअर केलाय. लाल ड्रेसमध्ये झळकणाऱ्या प्रियांकाच्या या आउटफिट्सची किंमत आहे 4 लाख रुपये!

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : प्रियांका चोप्राचा 37 वा वाढदिवस नुकताच झाला. अमेरिकेत नवरा निक जोनास आणि जवळच्या नातेवाईकांबरोबर तिने झोकात वाढदिवस साजरा केला. ही देसी गर्ल आता फक्त आपल्या देशातच नाही, तर जगभरात स्टाईल आयकॉन मानली जाऊ लागली आहे. वाढदिवसाच्या दिवशीचे तिचे कपडे आणि स्टाईल पाहिली तर याची खात्री पटेल. तिच्या या बर्थडे स्पेशल ड्रेसमधला व्हिडिओ नवरा निक जोनसनेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. बरगंडी लाल रंगाच्या या मिनी ड्रेसमध्ये प्रियांका धमाल करताना दिसेल. नवऱ्याने गायलेल्या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ खाली पाहा.

प्रियांकाच्या चोप्राच्या या बर्थ डे स्पेशल लाल ड्रेसची किंमत ऐकाल तर नवल वाटेल. 16Arlington या ब्रँडचा हा ड्रेस 1145 अमेरिकन डॉलर्सचा आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत होईल तब्बल 80,000 रुपये.

हेही वाचा : सहा बंगले आणि आठ लग्झरी गाड्या, जाणून घ्या प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती

हा चमचमता लाल ड्रेस आणि एक स्टायलिश पर्स घेऊन प्रियांका आपला नवरा निक जोनस आणि त्याचा भाऊ यांनी 2008 मध्ये गायलेल्या एका गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिने हातात घेतलेल्या क्लचची किंमत जवळपास 3 लाख रुपये होईल. लिपस्टिक क्लच 5,495 अमेरिकन डॉलर एवढ्या किमतीचा आहे, असं समजतं.

हेही वाचा : मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज खान? घटस्फोटानंतर असं आहे दोघांमधील नातं

लाल मिनी ड्रेस, लिपस्टिक क्लच याच्या साथीला प्रियांकाने गोल्डन स्ट्रॅपच्या हिल्स घातल्या आहेत. किटन हिल्स प्रकारच्या या हिल्स ड्रेसला अगदी सूट होणाऱ्या आहेत.

आपल्या गाण्यावर थिरकताना दिलखुलास हसणाऱ्या आपल्या बायकोचा व्हिडिओ निकनेच शेअर केला आहे. क्वांटिको या मालिकेनंतर प्रियांका चोप्रा अमेरिकेसह पाश्चिमात्य देशातलीही सेलेब्रिटी झाली आहे. काही अमेरिकन प्रोजेक्ट्सबरोबरच प्रियांकाने स्काय इज पिंक या शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमाचं शूट नुकतंच संपवलं आहे. या आगामी चित्रपटात तिच्याबरोबर फरहान अख्तर आणि झायरा वसीम असतील.

-----------------------------------------------------------------------------------

छोट्या एक शिंगी गेंड्याची मोठी अंघोळ, शॉवर बाथचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या