Home /News /lifestyle /

पादरी बनला Porn Star, 83व्या वर्षी बदललं करियर, सांगितला नव्या आयुष्याचा अनुभव

पादरी बनला Porn Star, 83व्या वर्षी बदललं करियर, सांगितला नव्या आयुष्याचा अनुभव

अमेरिकेतील (America) 83 वर्षांची एक व्यक्ती सध्या तिच्या हटके करिअरमुळे चर्चेत आहे. ही व्यक्ती पाद्री (Pastor) अर्थात धर्मगुरू होती; पण या व्यक्तीनं चक्क पॉर्नस्टार (Porn Star) बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

मुंबई, 25 मे : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात करिअर (Career) हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. आपलं करिअर चांगलं असावं, यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. अलीकडच्या काळात वाढत्या स्पर्धेमुळे करिअरविषयी लोक अधिकच सजग झाले आहेत. त्यामुळे करिअरला वयोमर्यादा राहिली नसल्याचं दिसून येतं. काही लोक तर वृद्धापकाळातही (Old Age) नोकरी करताना आपण पाहतो. अर्थात त्यामागे काही कारणं असू शकतात. अमेरिकेतील (America) 83 वर्षांची एक व्यक्ती सध्या तिच्या हटके करिअरमुळे चर्चेत आहे. ही व्यक्ती पाद्री (Pastor) अर्थात धर्मगुरू होती; पण या व्यक्तीनं चक्क पॉर्नस्टार (Porn Star) बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या व्यक्तीने अ‍ॅडल्ट चित्रपटात (Adult Movies) भूमिकादेखील केली आहे. या व्यक्तीनं करिअर म्हणून उचलेलं पाऊल लोकांना काही पसंत पडलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकादेखील होत आहे. पॉर्न इंडस्ट्रीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. गेल्या काही वर्षांत अनेक पॉर्न स्टार्सनी ही इंडस्ट्री सोडली असून या इंडस्ट्रीतल्या अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या आहेत. या इंडस्ट्रीविषयी समाजात नकारात्मक दृष्टिकोन असला तरी काही लोकांचं या इंडस्ट्रीत करिअर करण्याचं स्वप्न असतं. अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना (North Carolina) येथे राहणाऱ्या नॉर्म सेल्फ (Norm Self) या पूर्वाश्रमीच्या पाद्रीनं पॉर्न फिल्मस्टार बनण्यासाठी आपली नोकरी सोडली. हे निवृत्त पाद्री अलीकडेच त्यांच्या पहिल्या अ‍ॅडल्ट चित्रपटात झळकले. `हा अनुभव माझ्यासाठी खूपच मजेदार होता,` असं नॉर्म यांनी सांगितलं. उत्तर कॅरोलिनाच्या या माजी धर्मगुरूने मानवी तस्करीच्या जगातून मुक्त होण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला. ``लोकांना लैंगिकतेबद्दल शिक्षित करण्यात मला आनंद मिळत आहे,``असं नॉर्म सेल्फ यांनी ठामपणे सांगितलं. हे करिअर ज्येष्ठांसाठी नाही, अशी टिप्पणी करणाऱ्या लोकांविरोधात या पूर्वाश्रमीच्या पाद्र्यानं जाहीरपणे संताप व्यक्त केला आहे. ‘तसंच मला या कामातून आनंद मिळतो,’ असंही नॉर्म यांनी म्हटलं आहे. नॉर्म सेल्फ पूर्वी एक पाद्री म्हणून काम करत होते. साधारण 10 वर्षांपूर्वी त्यांनी हे काम सोडून दिलं होतं. त्यानंतर त्यांना आपण समलैंगिक (Gay) असल्याची जाणीव झाली. 2017 मध्ये त्यांनी एक अ‍ॅडल्ट चित्रपट बनवला होता. ``वयाच्या 83 व्या वर्षी सेक्स करणं हा माझ्यासाठी जीवनतला सर्वांत चांगला अनुभव होता. यापुढेही मी अ‍ॅडल्ट चित्रपटांतून भूमिका करत राहणार आहे,`` असं नॉर्म यांनी सांगितलं. नॉर्म यांच्या या हटके करिअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
First published:

पुढील बातम्या