मुंबई, 28 ऑगस्ट : फिट राहणे, बेली फॅट नसणे हे केवळ चांगले दिसण्यासाठीच नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीदेखील गरजेचे असते. पोटावरील वाढलेल्या चरबीमुळे अनेकदा आपली लोकांमध्ये लाजिरवाणी अवस्था होते. त्याचबरोबर या वाढलेल्या चरबीमुळे आपल्या काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या अॅक्टिव्हिटीबद्दल सांगणार आहोत. ज्या अगदी सोप्या आहेत आणि प्रभावीसुद्धा. तुम्ही रोज या अॅक्टिव्हिटीज केल्यास तुम्हाला बेली फॅटच्या समस्येला समोरच जावे लागणार नाही.
धावणे
स्टाईलक्रेजने दिलेल्या माहितीनुसार, तंदुरुस्त आणि हेल्दी ठेवण्यासाठी धावणे फायद्याचे ठरू शकते. धावल्यामुळे हृदय चांगले काम करते आणि अतिरिक्त कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे पोटावर अतिरिक्त चरबी साचत नाही आणि वाढलेली चरबी हळूहळू कमी होऊ होते. सुरुवातीला फक्त काही मीटर धावा आणि हळू धावा. शरीराला सवय झाली की वेग, अंतर आणि वेळ वाढवता येतात. धावणे हा पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्याचा एक मार्ग आहे.
Walking Barefoot : अनवाणी चालणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? हे आहेत फायदे आणि तोटे
पोहणे
पोहणे हादेखील कंबर आणि पोट कमी करण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. पोहणे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर शरीराला चांगले आकार देऊ शकते. तुम्ही हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. जर तुम्ही यापूर्वी कधीही पोहणे केले नसेल, तर ते फक्त प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली केले पाहिजे.
सायकलिंग
पोट कमी करण्याचा व्यायाम म्हणून सायकलिंग देखील करता येते. हा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा कार्डिओ व्यायाम मानला जातो. हा पाय आणि मांड्या यांचा चांगला व्यायाम होऊ शकतो. यासोबतच शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरीजही कमी करता येतात. सायकलिंगच्या फायद्यांमध्ये कंबरेची चरबी कमी करणेदेखील समाविष्ट असू शकते.
चालणे
वाढलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये चालणेदेखील समाविष्ट आहे. रोज सकाळ संध्याकाळी अर्धा तास चालता चालल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. यामुळे शरीरात साठलेली अतिरिक्त चरबीही कमी होऊ शकते. शक्य असल्यास वेगवान पायऱ्यांनी जा. वाढलेले पोट कमी करण्याचा हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग मानला जातो.
Worst Breakfast Habits: सकाळच्या न्याहारीतील या 4 चुकांमुळे नंतर वाढते ब्लड शुगर; वेळीच बदला सवयी
पायऱ्या चढणे
पोटाची चरबी कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे आणि उतरणेदेखील फायद्याचे ठरते. पोट कमी करण्यासाठी हा व्यायामा उत्तम आहे. पायऱ्या चढून आणि उतरूनही अतिरिक्त चरबी कमी करता येते. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी सुमारे 10 मिनिटे घराच्या पायऱ्या चढणे आणि उतरणे सुरू करता येते. ऑफिसला जातानाही लिफ्टऐवजी जिने वापरणे ही कंबर आणि पोट कमी करण्याच्या उपायांमध्ये समाविष्ट होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital prime time, Health Tips, Lifestyle, Weight loss tips