तुमचं टेन्शन दूर करण्यासाठीचा सोपा उपाय : फक्त 5 पॉइंट्सवर द्या थोडा मसाज

आपल्या शरीराचे असे काही भाग आहेत, जिथं मालिश केल्याने, दाब दिल्याने तुम्ही टेन्शन फ्री व्हाल. ताणतणावापासून तुम्हाला तात्पुरती का होईना पण मुक्ती मिळेल. अॅक्युप्रेशरची सोपी युक्ती टेन्शन दूर करेल. एकदा करून पाहा

• Share this:

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला ताणतणावानं ग्रासलं आहे. प्रत्येकाच्या ताणाची कारणं वेगवेगळी आहेत. मात्र या ताणाचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो. हा ताण जास्त वाढल्यास तो धोकादायक ठरू शकतो. या ताणाशी लढण्यासाठी आणि थोडा आराम मिळण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे मसाज.

कानाचा वरील भाग - कानाच्या वरील भागावर मालिश केल्याने अंगठा आणि तर्जनीने (अंगठ्याशेजारील बोट) कानाच्या वरील भागात हळूवार दाब देत मसाज करा. तणाव आणि निद्रानाशापासून आराम मिळतो.

भुवयांच्या (आयब्रो) मधोमध - तुमचे डोळे बंद करा. त्यानंतर हळू आणि दीर्घ श्वास घ्या. आता अंगठा किंवा तर्जनीने भुवयांच्या मधोमध हळूवारपणे गोलाकार दिशेनं मसाज करा.

अंगठा आणि तर्जनीमधील भाग - अंगठा आणि तर्जनीच्या मधील भागावर दाब गिल्याने डोकेदुखी आणि तणाव कमी होतो. सुरुवातीला दीर्घ श्वास घ्या आणि एका हाताचा अंगठा किंवा तर्जनीने दुसऱ्या हाताचा अंगठा आणि तर्जनीच्या मध्यभागात १० सेकंद दाब द्या आणि हळूवार मालिश करा.

मनगट - मनगटावर 3 बोटांच्या अंतरावरील भागात 5 सेंद अंगठ्याने दाब द्या. यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि ही प्रक्रिया कायम ठेवा.

खांदा - खांद्यावर मानेजवळ मध्यमा (हाताचं मधलं बोट) आणि अंगठ्याच्या सहाय्याने मालिश करा. मसाज करत ५ सेकंद दाब द्या. यामुळे फक्त तणावच नाही तर कामामुळे आलेला थकवाही दूर होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 10:06 PM IST

ताज्या बातम्या