प्रेझेंटेशन फसू नये असं वाटत असेल तर लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी

प्रेझेंटेशन फसू नये असं वाटत असेल तर लक्षात ठेवा 'या' 3 गोष्टी

प्रेझेंटेशनच्यामाध्यमातून काय संदेश देणार आहोत याची संपूर्ण तयारी तुम्हाला असायला हावी.

  • Share this:

मुंबई, 26 मे : प्रेझेंटेशन सादर करताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्याव लागतं. अशावेळेस अनेकदा चुकादेखील होतात. प्रेझेंटेशन फसू नये यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला प्रेझेंटेशन सादर करताना तुम्हाला फायदेशीर ठरतील.

कुणी काही सांगत असेल तर त्याचं म्हणणं ऐकून घेणं हे फार उदारतेचं काम असतं. कारण त्याला ऐकण्यासाठी लोकं आपलं लक्ष आणि वेळ हे दोन्हीही खर्च करत असतात. ही बाब लक्षात ठेवून प्रेझेंटेशन सादर करण्यापूर्वी तुम्हलाही त्याची पूर्ण तयारी करणं आवश्यक असतं. म्हणून प्रेझेंटेशनच्यामाध्यमातून आपण काय संदेश देणार आहोत याची संपूर्ण माहिती तुम्हाला असायला हावी. जर ती नसेल तर तुमचं प्रेझेंटेशन फसू शकतं. प्रेझेंटेशन सादर करताना आपलं हसं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टींची तुम्ही आवर्जून काळजी घ्यायला हवी.

यापुढे आयडियाजवर काम करणाऱ्यांनाच मिळेल नोकरीची संधी

1 - प्रेझेंटेशनच्या सुरुवातीलच तुम्ही जर थकल्याची गोष्ट करत असाल, तर आपण व्यर्थ वेळ घालवला असं प्रेक्षकांना वाटू शकतं. नाइलाजास्तव तुम्ही प्रेझेंटेशन देत आहात असं त्यांना वाटू शकतं. कुठल्यातरी कारणामुळे तुमचं प्रेझेंटेशन खराब होणार आहे हे जर तुम्हीच सांगत असाल तर ते फसलंच म्हणून समजा. अशावेळेस तुम्ही विनम्रतेने आपलं प्रेझेंटेशन कॅन्सल करा आणि कुठलिही दुसरी वेळ निश्चित करा.

2 - पूर्ण तयारी झालेली नाही असं सांगत असाल तर प्रेझेंटेशनच्या सुरूवातीलाच प्रेक्षकांच्या अपेक्षांचा तुम्ही भंग करता. तसंच तुम्ही तुमच्या कामाचा किती सन्मान करता हेसुद्धा तुम्ही दाखवून देता.  प्रेझेंटेशनला सुरुवात करण्याआधी आश्याक गोष्टी आणि महत्त्वाचे मॅसेजेस तुम्ही लिहून ठेवा. सुरुवातीला आणि शेवटी आपलं म्हणणं आणि उद्देश ठामपणे मांडा.

तुमची झोप अपुरी राहते का? वाचा 'हे' दुष्परिणाम

3 - प्रेझेंटेशनशी निगडित विविध तांत्रिक गोष्टींची तुम्ही आवशकतेप्रमाणे काळीज घ्या. लक्षात ठेवा स्लाइडमधली कोणतिही चूक तुम्हाला महागात पडू शकते, म्हणून स्लाइड नीट वाचून त्या क्रॉसचेकसुद्धा करा. तुम्ही आपल्या प्रेझेंटेशनची रिहर्सल करणंसुद्धा येथे अपेक्षीत आहे. यामुळे राहिलेल्या काही चुका तुम्हालाच सापडतात आणि त्या सुधारल्या जाऊ शकतात. एखादी चूक राहिलीच तर तिचा उल्लेख तोपर्यंत करू नका, जोपर्यंत ती कुणाच्या लक्षात येत नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2019 07:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading