Research: पती सोबत असेल तर कमी होतं Labour Pain

बहुतेक प्रकरणांमध्ये पतीच्या ऑपरेशन थिएटरमध्ये येण्यावरच प्रश्न उपस्थित केली जातात.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 03:44 PM IST

Research: पती सोबत असेल तर कमी होतं Labour Pain

एखादी स्त्री जेव्हा गरोजर असते तेव्हा बाळाच्या जन्मावेळी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. तेव्हा तिचा पती तिच्यासोबत आत जाण्याची मागणी करतो. अनेकदा डॉक्टर त्याची विनंती स्वीकारत त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये येण्याची परवानगी देतात. पण काही वेळा त्यांना स्पष्ट नकार दिला जातो. मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये पतीच्या ऑपरेशन थिएटरमध्ये येण्यावरच प्रश्न उपस्थित केली जातात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, डिलीवरी रूममध्ये पत्नीसोबत पती गेल्यास महिलेचं लेबर पेन (labor pain) कमी होतं.

सुमारे 48 जोडप्यांवर हे संशोधन करण्यात आलं. यात गरोदर महिला त्यांच्या पतीसमोर प्रसुती वेदना जास्त काळ सहन करत असल्याचं स्पष्ट झालं. जोडीदाराच्या उपस्थितीमुळे तिची सहनशक्ती वाढते. प्रसुतीच्यावेळी जोडीदारासोबत बोलत राहिल्यावर आणि त्याच्या स्पर्शाने वेदना कमी होणं स्वाभाविक आहे.

संशोधनातही हे दिसून आलं की, पतीच्या फक्त उपस्थितीनेच महिलेची सहनशक्ती वाढते आणि त्यांच्या वेदना कमी होता. 2017 मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ रोलोरॅडोच्या संशोधनात हे दिसून आलं की, जोडीदाराने हात पकडला तरी डिलीवरीदरम्यान, महिलेला प्रसुती वेदना कमी होतात.

एकटे राहणारे असतात इंटेलिजेंट! संशोधनात झालं सिद्ध

मान दुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार

Loading...

व्हायरल तापापासून वाचण्यासाठी हे 4 घरगुती उपाय करून पाहा, मिळेल लगेच आराम

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...