पुण्याची ही धडाडीची पोलीस अधिकारी ठरली Mrs India : कहाणी ऐकून व्हाल थक्क

सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांच्या समन्वयाने सौंदर्यस्पर्धेचे विजेते ठरवले जातात. पण मिसेस इंडियामध्ये या वर्षी या एका स्पर्धकाने सर्वांचीच मनं जिंकली. ही स्पर्धक फक्त सुंदर दिसत नाही, तर ती आपल्या बुद्धीने आणि ताकदीने चोर, गुंड, दरोडेखोर यांनाही पकडते. पुण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची थक्क करणारी कामगिरी...

  • Share this:

सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांच्या समन्वयाने सौंदर्यस्पर्धेचे विजेते ठरवले जातात. पण मिसेस इंडियामध्ये या वर्षी या एका स्पर्धकाने सर्वांचीच मनं जिंकली. ही स्पर्धक फक्त सुंदर दिसत नाही, तर ती आपल्या बुद्धीने आणि ताकदीने चोर, गुंड, दरोडेखोर यांनाही पकडते.

प्रेमा विघ्नेश पाटील यांना गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीत मिसेस इंडिया 2019 चा मुकुट मिळाला.

पुण्याच्या या महिलेनं मिसेस इंडिया 2019 चा किताब जिंकला आहे. मॉडेलिंग, अभिनय किंवा तत्सम क्षेत्रातल्या मुली सौंदर्यस्पर्धांकडे वळतात, पण या वेळच्या विजेतीची गोष्ट जरा हटके आहे.

प्रेमा पाटील या केवळ सौंदर्यवती नव्हेत, तर त्या बुद्धीमान पोलीस अधिकारी आहेत.

प्रेमा पाटील मुळच्या कराडच्या आहेत. स्वतःचा छंद जपण्यासाठी त्यांनी या सौंदर्यस्पर्धेचा ऑनलाईन अर्ज भरला आणि स्पर्धा जिंकलीसुद्धा.

Loading...

प्रेमा पाटील पुणे पोलीस दलाच्या विशेष शाखेत सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात.

29 वर्षीय प्रेमा पाटील कॉमर्सच्या पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. 2010 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून त्या महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाल्या.

पुण्याच्या आधी त्या मुंबईत कार्यरत होत्या. ठाणे पोलीस स्टेशनमध्येही त्यांनी ड्युटी बजावली आहे.

लग्नानंतर पती विघ्नेश पाटील यांची नेहमी साथ मिळाली. त्यामुळे नोकरीची जबाबदारी सांभाळण्याबरोबर आपला छंद जोपासण्यालाही प्रोत्साहन मिळालं, असं प्रेमा यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

मिसेस इंडियाच्या अंतिम फेरीत त्यांनी G20 या विषयावर प्रेझेंटेशन करत बुद्धीमत्तेची चुणूक दाखवली.

खून, मारामाऱ्या, चोऱ्या याच गोष्टींची दिवसभर चर्चा होत असलेला त्यांचा जॉब. पण पोलीस दलातली ड्युटी म्हणजे कायम ताणतणाव या समजुतीला प्रेमा यांच्या कामगिरीने वेगळं उत्तर मिळालं आहे.

पुण्यात झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रेमा पाटील यांनी एका दाक्षिणात्य सिनेगीतावर नृत्य केलं. G20 Summit सारख्या विषयावर प्रेझेंटेशन केलं आणि उत्तम रँपवॉकही केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...