मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चंद्रग्रहणा दरम्यान काय घ्यायची काळजी ? गर्भवती महिलांसाठी काही खास नियम

चंद्रग्रहणा दरम्यान काय घ्यायची काळजी ? गर्भवती महिलांसाठी काही खास नियम

Chandra Grahan 2021

Chandra Grahan 2021

खगोलप्रेमींना अंतराळातला (Astronomy) आविष्कार बघण्याची दुर्मीळ संधी 19 नोव्हेंबरला मिळणार आहे. या दिवशी आकाशात दीर्घ काळ चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) दिसणार आहे.

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर:  खगोलप्रेमींना अंतराळातला (Astronomy) आविष्कार बघण्याची दुर्मीळ संधी 19 नोव्हेंबरला मिळणार आहे. या दिवशी आकाशात दीर्घ काळ चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) दिसणार आहे. अर्थात हे चंद्रग्रहण भारताच्या बहुतांश भागांत दिसणार नाही; पण शतकातलं दुर्मीळ आणि सर्वांत जास्त काळ चालणारं असं चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी असल्यानं खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या छायेखाली येतो तेव्हा चंद्रग्रहण होतं. आपल्याकडे हे ग्रहण दिसणार नसलं तरी त्या काळात काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. याबद्दलचं वृत्त 'इंडिया टीव्ही'नं दिलं आहे.

19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल आणि सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी ते संपेल. हे सर्वांत दीर्घ काळ चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण असेल. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘NASA’ नं ही माहिती दिली आहे. हे चंद्रग्रहण पृथ्वीपासून जास्त अंतरावर आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाला मायक्रो बीव्हर मून (The Micro Beaver Moon) असं म्हटलं गेलं आहे.

चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी घ्यायची काळजी (Precaution For Pregnant Ladies)

- ग्रहण काळातला प्रकाश गर्भाच्या आरोग्यासाठी चांगला नसल्याने या काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडायचं शक्यतो टाळावं.

- या काळात गर्भवती महिलांबरोबरच सर्वसामान्य लोकांनीही सुईमध्ये दोरा ओवू नये.

- ग्रहण काळात गर्भवती महिलांनी स्वत: ची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम करू नये.

- ग्रहण कालावधी संपल्यानंतरच अंघोळ करावी. अंघोळ करणं अत्यंत आवश्यक आहे.

‘हे’ करा आणि ‘हे’ करू नका

- उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नका. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहिल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे टेलिस्कोप दुर्बीण किंवा विशेष चष्म्याच्या साह्यानेच ग्रहण पाहिलं जावं.

- चंद्रग्रहण कालावधीत काहीही खाऊ नये. शिळं अन्न आणि दूधही घेऊ नका. उपाशी राहणं शक्य नसेल तर तुमच्या खाद्यपदार्थ्यांच्या डिशेसमध्ये तुळशीपत्रं ठेवावीत. विशेषत: दुधापासून तयार केलेल्या पदार्थांवर तर तुळशीपत्र अवश्य ठेवावं.

- ग्रहण काळात त्याचे वाईट परिणाम कमी होण्यासाठी देवाचं नामस्मरण करावं आणि जप करावा.

- चंद्रग्रहण काळात केस किंवा नखं कापू नयेत. या काळात नखं किंवा केस कापणं अशुभ मानलं जातं. या काळात चाकू, सुऱ्या, काटे चमचे, कोणत्याही प्रकारची टोकदार आणि धारदार शस्त्रं वापरू नयेत.

- चंद्रग्रहण संपलं की त्यानंतर अन्नदान आणि कपड्यांचं दान करावं

ऑस्ट्रेलिया, पश्चिम युरोप, न्यूझीलंड, उत्तर अमेरिका, पॅसिफिक बेटे आणि जपानच्या काही भागात चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्र उगवतेवेळी सुरुवातीला पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये थोडंसं ग्रहण दिसेल. दक्षिण अमेरिका आणि पश्चिम युरोपमधले नागरिक चंद्रग्रहणाचं उत्तम दर्शन घेऊ शकतील. तब्बल 580 वर्षांनंतर होणारं हे दीर्घ ग्रहण आफ्रिका, मध्य पूर्व आणि पश्चिम आशियामधल्या नागरिकांना दिसणार नाही.

भारतात हे चंद्रग्रहण सगळीकडे दिसणार नाही. ईशान्य भारतातल्या अनेक प्रदेशांत हे चंद्रग्रहण दिसणार आहे. आगरतळा, ऐझॉल, कोलकाता, चेरापुंजी, कूचबिहार, डायमंड हार्बर, दिघा, गुवाहाटी, इम्फाळ, इटानगर, कोहिमा, लामडिंग, मालदा, उत्तर लखीमपूर, पासीघाट, पोर्ट ब्लेअर, पुरी, शिलाँग, शिवसागर आणि सिल्चर आदी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे.

First published:

Tags: Health Tips, Pregnant, Pregnant woman